
अंडर 19 वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील मलेशिया विरुद्धचा सामना भारताने अवघ्या 17 चेंडूत संपवला. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने 14.3 षटक टाकतं मलेशियाला अवघ्या 31 धावांवर सर्वबाद केलं. तसेच विजयासाठी मिळालेल्या 32 धावा 2.5 षटकात एकही विकेट न गमवता पूर्ण केल्या. या सामन्यात वैष्णवी शर्माची कमाल दिसली. मलेशिया फलंदाजी करत असातना 13 व्या षटकापर्यंत7 बाद 30 धावा अशी स्थिती होती. टीम इंडियाची कर्णधार निकी प्रसादने संघाचं 14 वं आणि वैष्णवीला तिचं वैयक्तिक चौथं षटक सोपवलं होतं. पहिल्या चेंडू वैष्णवी निर्धाव टाकला. त्यानंतरच्या तीन चेंडूवर तीन विकेट घेत हॅटट्रीक नोंदवली. दुसऱ्या चेंडूवर नुर अईन बिन्टीला पायचीत केलं. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर नुर इस्मा दानियाला पायचीत केलं. तर चौथ्या चेंडूवर सिति नवाहला त्रिफळाचीत करत हॅटट्रीक घेतली. वैष्णवी शर्माचा हा डेब्यू सामना होता आणि पहिल्याच सामन्यात तिने ही कमाल केली.
वैष्णवी शर्माने या सामन्यात चार षटकं टाकली. त्यात एक षटक निर्धाव टाकलं. तसेच फक्त 5 धावा देत पाच विकेट घेतल्या. यावेळी तिचा इकोनॉमी रेचट हा 1.20 इतका होता. वैष्णवीने हॅटट्रीक घेतल्यानंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. स्वप्न पूर्ण झाल्याचं वैष्णवीने सामन्यानंतर सांगितलं. वैष्णवी अंडर 19 टी20 वर्ल्डकप 2025 स्पर्धेत हॅटट्रीक घेणारी पहिली गोलंदाज ठरली आहे. यापूर्वी या स्पर्धेत असा कारनामा तीन खेळाडूंच्या नावावर आहे. भारताकडून अशी कामगिरी करणारी वैष्णवी ही पहिली गोलंदाज ठरली आहे.
𝕎 𝕎 𝕎#TeamIndia‘s left arm spinner & debutant Vaishnavi Sharma becomes the first Indian bowler to pick up a hattrick in #U19WomensWorldCup tournament! 🙌🏻#U19WomensT20WConJioStar 👉 #INDWvMASW, LIVE NOW on Disney+ Hotstar! pic.twitter.com/DaEdFnus07
— Star Sports (@StarSportsIndia) January 21, 2025
मलेशिया महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): नूर आलिया हेरुन (विकेटकीपर), नुनी फारिनी सफारी, हुस्ना, नूर दानिया स्युहादा (कर्णधार), नूर इज्जातुल स्याफिका, नुरीमन हिदाय, सुआबिका मनिवन्नन, नूर ऐन बिंती रोस्लान, नूर इस्मा दानिया, सिती नाजवा, मार्स्या किस्टिना अब्दुल्ला.
भारत महिला अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): गोंगडी त्रिशा, जी कमलिनी (विकेटकीपर), सानिका चाळके, निकी प्रसाद (कर्णधार), भाविका अहिरे, मिथिला विनोद, आयुषी शुक्ला, जोशिता व्हीजे, शबनम मो. शकील, पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा.