WWC 2022, IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी मोठा विजय, Semi-finalआशा जीवंत

| Updated on: Mar 22, 2022 | 2:01 PM

भारताने आज सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. स्मृती मानधना (30) आणि शेफाली वर्मा (42) या दोघींनी 74 धावांची सलामी दिली.

WWC 2022, IND vs BAN: भारताचा बांगलादेशवर 110 धावांनी मोठा विजय, Semi-finalआशा जीवंत
IND W vs BAN W
Image Credit source: ICC
Follow us on

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women’s World Cup) स्पर्धेमध्ये आज हॅमिल्टन येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवण्यात आला. विश्वचषकाच्या मैदानात दोन्ही संघांची ही पहिलीच भेट होती. या स्पर्धेतील हा 22 वा सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने (India Women’s cricket Team) 7 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली होती. 230 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला (Bangladesh Women’s cricket Team) हे आव्हान पेलवलं नाही. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाचा अवघ्या 119 धावांत धुव्वा उडवला. त्यामुळे भारताला 110 धावांनी मोठा विजय मिळवण्यात यश आलं आहे. या विजयामुळे भारताचा नेट रनरेट आणखी सुधारला आहे. ज्याचा फायदा सेमीफायनलमध्ये पात्र होण्यासाठी होईल. या विजयामुळे भारताच्या विजयाच्या आशा अद्याप जीवंत आहेत.

भारताने आज सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. स्मृती मानधना (30) आणि शेफाली वर्मा (42) या दोघींनी 74 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या यास्तिका भाटियाने (50) अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये पूजा वस्त्राकर (30) आणि स्नेह राणाच्या (27) फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघ दुबळ्या बांगलादेशसमोर केवळ 229 धावा उभारु शकला. भारताच्या मधळ्या फळीने आज निराशा केली. कर्णधार मिताली राज भोपळादेखील फोडू शकली नाही. तर भरवशाची फलंदाज हरमनप्रीत कौर 14 धावांचं योगदान देऊ शकली.

दरम्यान, 230 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशकडून सलमा खातून (32) आणि लता मोंडल (24) या दोघींनी भारतीय गोलंदाजीचा काही वेळ सामना केला. उर्वरीत कोणत्याही बांगलादेशी फलंदाजाला 20 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. 7 बांगलादेशी फलंदाज दुहेरी धावसंख्या देखूल गाठू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 119 धावांत बांगलादेशचा धुव्वा उडवला. भारताकडून या डावात स्नेह राणाने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर पूजा वस्त्राकर आणि झूलन गोस्वामीने दोन फलंदाज बाद केले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

स्नेह राणाची अष्टपैलू कामगिरी

स्नेह राणाने आजच्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. स्नेहने फलंदाजी करताना 23 चेंडूत 27 धावा फटकावल्या. तर गोलंदाजीत तिने 10 षटकात (2 निर्धाव षटकं) 30 धावा देत 4 बळी घेतले. भारताची मधळी फली ढेपाळल्यामुळे भारत 200 धावांचा आकडा गाठू शकणार नाही असे वाटत असताना स्नेह राणाने फटकेबाजी करुन भारताला द्विशतकी टप्पा गाठून दिला. गोलंदाजीतही तिने उत्कृष्ट कामगिरी केली.

इतर बातम्या 

IPL 2022: Lucknow Supergiants मध्ये झिम्बाब्वेच्या तुफानी गोलंदाजाची एंट्री, मार्क वूडची जागा घेणार?

Jasprit Bumrah Wife Sanjana Ganeshan: जसप्रीत बुमराहच्या बायकोची न्यूझीलंडमध्ये सुरु आहे मौज-मस्ती, पहा काही खास PHOTOS

CSKvsKKR IPL 2022: पहिल्या सामन्यासाठी संघ निवड धोनीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी, तीन प्रमुख खेळाडूंशिवाय उतरणार