IND vs BAN, LIVE Score, Women’s World Cup 2022: 119 धावांत बांगलादेशचा खुर्दा, भारताचा मोठा विजय

| Updated on: Mar 22, 2022 | 3:08 PM

India Women vs Bangladesh Women live cricket score and updates in Marathi : हॅमिल्टन येथे भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना खेळवला जात आहे.

IND vs BAN, LIVE Score, Women’s World Cup 2022: 119 धावांत बांगलादेशचा खुर्दा, भारताचा मोठा विजय
IND W vs BAN WImage Credit source: AFP

ICC महिला विश्वचषक 2022 स्पर्धेमध्ये आज हॅमिल्टन येथे भारत आणि बांगलादेश यांच्या सामना खेळवण्यात आला. विश्वचषकाच्या मैदानात दोन्ही संघांची ही पहिलीच भेट होती. या स्पर्धेतील हा 22 वा सामना होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 7 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली होती. 230 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघाला हे आव्हान पेलवलं नाही. भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाचा अवघ्या 119 धावांत धुव्वा उडवला. त्यामुळे भारताला 110 धावांनी मोठा विजय मिळवण्यात यश आलं आहे. या विजयामुळे भारताचा नेट रनरेट आणखी सुधारला आहे. ज्याचा फायदा सेमीफायनलमध्ये पात्र होण्यासाठी होईल.

भारताने आज सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. स्मृती मानधना (30) आणि शेफाली वर्मा (42) या दोघींनी 74 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या यास्तिका भाटियाने (50) अर्धशतकी खेळी केली. अखेरच्या षटकांमध्ये पूजा वस्त्राकर (30) आणि स्नेह राणाच्या (27) फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघ दुबळ्या बांगलादेशसमोर केवळ 229 धावा उभारु शकला.

230 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशकडून सलमा खातून (32) आणि लता मोंडल (24) या दोघींनी भारतीय गोलंदाजीचा काही वेळ सामना केला. उर्वरीत कोणत्याही बांगलादेशी फलंदाजाला 20 हून अधिक धावा करता आल्या नाहीत. 7 बांगलादेशी फलंदाजा दुहेरी धावसंख्या देखूल गाठू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 119 धावांत बांगलादेशचा धुव्वा उडवला. भारताकडून या डावात स्नेह राणाने सर्वाधिक 4 बळी घेतले. तर पूजा वस्त्राकर आणि झूलन गोस्वामीने दोन फलंदाज बाद केले. राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादवला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

भारताची प्लेइंग XI

यस्तिका भाटिया, स्मृती मानधना, शेफाली वर्मा, मिताली राज, हरमनप्रीत कौर, रिचा घोष, स्नेह राणा, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, झुलन गोस्वामी

बांगलादेशची प्लेइंग XI

शमीमा सुलताना, शर्मीन अख्तर, फरगाना होक, निगार सुलताना (कर्णधार), रुमाना अहमद, रितू मोनी, फहिमा खातून, सलमा खातून, नाहिदा अख्तर, जहाँआरा आलम, फरीहा ट्रिसना

Key Events

स्पर्धेत भारताची आतापर्यंतची कामगिरी

भारतीय संघाने याआधी स्पर्धेत 5 सामने खेळले आहेत, ज्यात 2 जिंकले आहेत तर 3 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला आहे. भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे.

स्पर्धेत बांगलादेशची आतापर्यंतची कामगिरी

बांगलादेशच्या संघाने याआधी 4 सामने खेळले असून त्यात फक्त 1 जिंकला आहे. म्हणजेच त्यांनी 3 सामने गमावले आहेत. गुणतालिकेत ते सातव्या क्रमांकावर आहेत.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 22 Mar 2022 01:15 PM (IST)

    बांगलादेशची अखरेची फलंदाज माघारी

    41 व्या षटकात झुलन गोस्वामीने रितू मोनी (16) हिला त्रिफळाचित केलं. भारतीय गोलंदाजांनी 119 धावांत बांगलादेशचा धुव्वा उडवला. त्यामुळे भारताला 110 धावांनी मोठा विजय मिळवण्यात यश आलं आहे. या विजयामुळे भारताचा नेट रनरेट आणखी सुधारला आहे. ज्याचा फायदा सेमीफायनलमध्ये पात्र होण्यासाठी होईल.

  • 22 Mar 2022 01:02 PM (IST)

    भारताला 9 वं यश, नाहिदा अख्तर बाद

    भारतीय गोलंदाजांना 9 वं यश मिळालं आहे. स्नेह राणाने नाहिदा अख्तर (0) हिला आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केलं. (बांगलादेश 104/9)

  • 22 Mar 2022 12:50 PM (IST)

    बांगलादेशची 8 वी फलंदाज माघारी

    बांगलादेशची 8 वी फलंदाज माघारी परतली आहे. 35 व्या षटकात स्नेह राणाने फहिमा खातून (1) हिला पायचित पकडलं. (बांगलादेश 100/8)

  • 22 Mar 2022 12:28 PM (IST)

    भारताला 6 वं यश, आक्रमक सलमा खातून 32 धावांवर बाद

    भारतील गोलंदाजांना 6 वं यश मिळालं आहे. झुलन गोस्वामीने आक्रमक सलमा खातूनला 32 धावांवर असताना यष्टीरक्षक रिचा घोषकरवी झेलबाद केलं. (बांगलादेश 75/6)

  • 22 Mar 2022 11:48 AM (IST)

    35 धावांत बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत

    स्नेह राणाने वैयक्तिक दुसरा बळी मिळत बांगलादेशचा निम्मा संघ तंबूत धाडला आहे. तिने 18 व्या षटकात रुमाना अहमद (2) हिला यास्तिका भाटियाकरवी झेलबाद केलं. (बांगलादेश 35/5)

  • 22 Mar 2022 11:28 AM (IST)

    भारताला चौथं यश, सलामीवीर मुर्शीदा खातून माघारी

    पूनम यादवने भारताला चौथं यश मिळवून दिलं आहे. तिने बांगलादेशची सलामीवीर मुर्शीदा खातून हिला 19 धावांवर असताना हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद केलं. (बांगलादेश 31/4)

  • 22 Mar 2022 11:17 AM (IST)

    भारताला तिसरं यश, कर्णधार नगर सुलताना बाद

    स्नेह राणाने भारताला तिसरं यश मिळवून दिलं आहे. तिने बांगलादेशची कर्णधार नगर सुलताना हिला 3 धावांवर असताना हरमनप्रीत कौरकरवी झेलबाद केलं. (बांगलादेश 28/3)

  • 22 Mar 2022 10:53 AM (IST)

    बांगलादेशला दुसरा धक्का, फरगाना हक माघारी

    भारतीय गोलंदाजांनी 9 व्या षटकात बांगलादेशला दुसरा धक्का दिला. पूजा वस्त्राकरने फरगाना हकला (0) पायचित पकडलं. (बांगलादेश 15/2)

  • 22 Mar 2022 10:45 AM (IST)

    बांगलादेशला पहिला धक्का, सलामीवीर शमीम अख्तर माघारी

    भारतीय गोलंदाजांनी 6 व्या षटकात बांगलादेशला पहिला धक्का दिला आहे. राजेश्वरी गायकवाडने सलामीवीर शमीम अख्तरला 5 धावांवर असताना स्नेह राणाकरवी झेलबाद केलं. (बांगलादेश 12/1)

  • 22 Mar 2022 10:35 AM (IST)

    बांगलादेशच्या डावाला सुरुवात

    बांगलादेशच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर मुर्शीदा खातून आणि शमीम अख्तर क्रीझवर, भारताची कर्णधार मिताली राजने चेंडू अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीकडे सोपवला आहे.

  • 22 Mar 2022 09:54 AM (IST)

    भारताचं बांगलादेशला 230 धावांचं आव्हान

    यास्तिका भाटियाचं संयमी (50) अर्धशतक, शेफाली वर्मा (42), पूजा वस्त्राकर (30), स्मृती मानधना (30) आणि स्नेह राणाच्या 27 धावांच्या योगदानाच्या जोरावर भारतीय संघ दुबळ्या बांगलादेशसमोर केवळ 229 धावाच उभारु शकला.

  • 22 Mar 2022 09:49 AM (IST)

    भारताची 7 वी फलंदाज माघारी, स्नेह राणा 27 धावांवर बाद

    भारताची 7 वी फलंदाज माघारी परतली आहे. जहाँआरा आलमने स्नेह राणाला 27 धावांवर असताना रितू मोनीकरवी झेलबाद केलं. (भारत 224/7)

  • 22 Mar 2022 09:35 AM (IST)

    भारताचं द्विशतक

    47 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पूजा वस्त्राकरने शानदार चौकार वसूल करत धावफलकावर भारताचं द्विशतक झळकावलं आहे. (भारत 200/6)

  • 22 Mar 2022 09:22 AM (IST)

    भारताची 6 वी फलंदाज माघारी, यास्तिका भाटिया बाद

    अर्धशतकवीर यास्तिका भाटिया माघारी परतली आहे. रितू मोनीने यास्तिकाला नाहिदा अख्तरकरवी झेलबाद केलं. (भारत 176/6)

  • 22 Mar 2022 09:20 AM (IST)

    यास्तिका भाटियाचं अर्धशतक

    यास्तिका भाटियाने 79 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीत अवघे दोन चौकार होते. लागोपाठ तीन विकेट गेल्यानंतर भारतीय संघ बॅकफुटवर होता. यास्तिकाने एकेरी-दुहेरी धावा घेत धावफलक हलता ठेवला. तिने टीम इंडियाला पावणे दोनशे धावांचा टप्पा पार करुन दिला आहे.

  • 22 Mar 2022 09:06 AM (IST)

    भारताला पाचवा धक्का, रिचा घोष माघारी

    भारताने पाचवी विकेट गमावली आहे. नाहिदा अख्तरने रिचा घोषला नगर सुलतानाकरवी झेलबाद केलं. (भारत 166/5)

  • 22 Mar 2022 08:13 AM (IST)

    भारताला चौथा धक्का, हरमनप्रीत कौर माघारी

    भारताने चौथी विकेट गमावली आहे. हरमनप्रीत कौर 14 धावांवर असताना फरगाना हकने तिला धावबाद केलं. (भारत 108/4)

  • 22 Mar 2022 08:05 AM (IST)

    भारताचं शतक, हरमन-यास्तिकाचा डाव सावरण्याचा प्रयत्न

    अवघ्या तीन धावात तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर हरमनप्रीत कौर आणि यास्तिका भाटियाने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे. या दोघींनी 10 षटकात 29 धावांची भागीदारी करत धावफलकावर भारताचं शतक झळकावलं आहे. (भारत 103/3)

  • 22 Mar 2022 07:43 AM (IST)

    बांगलादेशला तिसरं यश, कर्णधार मिताली राज शून्यावर बाद

    बांगलादेशच्या गोलंदाजांना तिसरं यश मिळालं आहे. रितू मोनी हिने मिताली राजला (0) फहिमा खातूनकरवी झेलबाद केलं. (भारत 74/3)

  • 22 Mar 2022 07:39 AM (IST)

    भारताला दुसरा धक्का, आक्रमक शेफाली वर्मा माघारी

    भारताला आणखी एक धक्का बसला आहे. बांगलादेशची गोलंदाज रितू मोनी हिने शेफाली वर्माला (42) नगर सुलतानाकरवी झेलबाद केलं. (भारत 74/2)

  • 22 Mar 2022 07:28 AM (IST)

    भारताला मोठा झटका, सलामीवीर स्मृती मानधना बाद

    बांगलादेशच्या गोलंदाजांनी भारताला मोठा धक्का दिला आहे. नाहिदा अख्तरने सलामीवीर स्मृती मानधना हिला 30 धावांवर असताना फरगाना हककरवी झेलबाद केलं. (भारत 74/1)

  • 22 Mar 2022 07:19 AM (IST)

    शेफालीचा आक्रमक पवित्रा, भारताचं अर्धशतक

    धिमी सुरुवात करणाऱ्या शेफाली वर्माने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 10 व्या षटकात शेफालीने तीन चौकार वसूल करत भारताचं अर्धशतक पूर्ण केलं. सुरुवातीच्या 10 चेंडूत 3 धावा करणाऱ्या शेफालीने 22 चेंडूत 28 धावा केल्या आहेत.

  • 22 Mar 2022 06:57 AM (IST)

    भारताची सावध सुरुवात

    भारतीय सलामीवीरांनी सावध सुरुवात केली आहे. 7 षटकात टीम इंडियाने धावफलकावर 23 धावा झळकावल्या आहेत. 7 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्मृती मानधनाने चौकार वसलू केला. तिने आतापर्यंत 32 चेंडूत 20 धावा केल्या आहेत. तर शेफाली वर्माने 10 चेंडूत 3 धावा केल्या आहेत.

  • 22 Mar 2022 06:49 AM (IST)

    भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल

    भारताने बांगलादेशविरुद्धच्या आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. टीम इंडियाने मेघना सिंगच्या जागी पूनम यादवला संधी दिली आहे.

  • 22 Mar 2022 06:46 AM (IST)

    मितालीने नाणेफेक जिंकली

    बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात मिताली राजने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आता सामना जिंकण्याची वेळ आहे. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करणार आहे. हॅमिल्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. अशा स्थितीत भारताचा प्रयत्न मोठी धावसंख्या उभारण्याचा असेल, जेणेकरून सामना डकवर्थ-लुईस नियमामध्ये अडकला तरी, भारताच्या विज्याच्या शक्यता असतील.

Published On - Mar 22,2022 6:44 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.