AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs SL : अफगाणिस्तानकडून स्पर्धेत तिसरा मोठा उलटफेर, इंग्लंड पाकिस्ताननंतर श्रीलंकेला दे धक्का

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने तिसरा धक्का दिला आहे. इंग्लंड, पाकिस्ताननंतर श्रीलंकेला पराभूत केलं आहे. अफगाणिस्तानने जबरदस्त कामगिरी करत तीन संघांना पराभवाचं पाणी पाजलं आहे.

AFG vs SL : अफगाणिस्तानकडून स्पर्धेत तिसरा मोठा उलटफेर, इंग्लंड पाकिस्ताननंतर श्रीलंकेला दे धक्का
AFG vs SL : अफगाणिस्तानची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच, श्रीलंकेला 7 गडी राखून केलं पराभूतImage Credit source: Twitter
| Updated on: Oct 30, 2023 | 10:02 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानने जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन केलं आहे. तीन दिग्गज संघांना पराभूत स्पर्धेतील अस्तित्व दाखवून दिलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला दुबळा संघ म्हणून गृहीत धरणं चांगलंच महागात पडू शकतं. अफगाणिस्तानने उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. तर श्रीलंकेची उपांत्य फेरीची वाट आणखी बिकट केली आहे. अफगाणिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच श्रीलंकेला 241 धावांवर रोखलं आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान अफगाणिस्तानने 28 चेंडू राखून आणि तीन गडी गमवून सहज पूर्ण केलं. अफगाणिस्तानला पहिल्याच षटकात धक्का मिळाला होता. पण त्यानंतर इब्राहीम झादरान आणि रहमत शाह यांनी डाव सावरला.

अफगाणिस्तानचा डाव

अफगाणिस्तानला रहमनुल्लाह गुरबाज याच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यानंतर इब्राहीम झादरान आणि रहमत शाह या जोडीने 73 धावांची भागीदारी केली. तर रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह ओमरजाई यांनी अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे अफगाणिस्तानचा विजय सोपा झाला. श्रीलंकेकडून मदुशंका याने 2, तर कसुन रजिथा याने 1 गडी बाद केला. या व्यतिरिक्त एकाही गोलंदाजाला गडी बाद करण्यात यश आलं नाही.

गुणतालिकेत अफगाणिस्तानने 6 गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानचा पुढचा सामना 3 नोव्हेबर रोजी नेदरलँडशी आहे. त्यानंतर 7 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाशी आणि 10 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी लढत असणार आहे. अफगाणिस्तानचा फॉर्म पाहता दिग्गज संघांनी कमी लेखून चालणार नाही. गुणतालिकेत श्रीलंकेचा संघ सहाव्या स्थानी असून उपांत्य फेरीसाठी मोठ्या चमत्काराची आवश्यकता आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, अँजेलो मॅथ्यूज, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मधुशंका

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा