World Cup 2023 : ज्याची भीती तेच झालं, वर्ल्ड कपआधी एकाचवेळी दोन मॅचनविनर खेळाडू बाहेर!

World Cup 2023 Sisanda Magala Injury : वर्ल्ड कप आधी दुखापतींच ग्रहण सर्व संघांच्या पाठीमागे लागल्याचं दिसत आहे. कारण सर्वच संघांमध्ये कोणते ना कोणते खेळाडू दुखापतीने त्रस्त आहेत. अशातच दोन खेळाडू दुखापती झाल्याने संघाला मोठा झटका बसला आहे.

World Cup 2023 : ज्याची भीती तेच झालं, वर्ल्ड कपआधी एकाचवेळी दोन मॅचनविनर खेळाडू बाहेर!
| Updated on: Sep 21, 2023 | 3:42 PM

मुंबई : वर्ल्ड कपच्या (World Cuo 2023) थराराला अवघे काही दिवस बाकी असताना संघाला मोठा धक्का बसलाय. वर्ल्ड कपआधी सर्व संघाच्या दोन-तीन सामन्यांच्या मालिका सुरू आहेत. वर्ल्ड कपआधी  रंगीत तालीम म्हणून फायद्याचं ठरेल मात्र खेळाडूंच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलं आहे. आधीच अनेक संघातील स्टार खेळाडू दुखापतींचा सामना करत असताना एका संघाला ‘जोर क झटका’ बसलाय. एकाचवेळी संघातील दोन मोठे दुखापतीमुळे बाहेर पडले आहेत.

कोण आहेत ते खेळाडू?

दुखापतीमुळे दोन्ही खेळाडू बाहेर पडल्याने टीम मॅनेजमेंटला मोठा धक्का बसला. संपूर्ण सामना एकट्याच्या दमावर पालटवण्याची ताकद असणारा खेळाडू एनरिक नॉर्तजे आधीच बाहेर पडला आहे. मोठा खेळाडू बाहेर पडला असताना गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणखी एक वर्ल्डकपमधून आऊट झाला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज सिसांडा मगाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या घरच्या मालिकेत दुसऱ्या वन डे सामन्यामध्ये एनरिक नॉर्तजे याच्या पाठीचा त्रास झाला होता. या सामन्यामध्ये 5 ओव्हर टाकून नॉर्तजे बाहेर पडला होता. वर्ल्ड कपपर्यंत नॉर्तजे बरा होईल असं वाटलं होतं मात्र तो काही बरा झाला नाही. शेवटी नॉर्तजे बाहेर पडला आणि आता सिसांडा बाहेर पडल्याने आफ्रिका संघाच्या अडचणीत वाढ झालीये.

 

दरम्यान, वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना 7 ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. याआधी आफ्रिका संघाचे दोन सराव सामने होणार आहे. त्याआधी 28 सप्टेबरपर्यंत दोन खेळाडूंच्या बदल्यात संघामध्ये अँडिले फेहलुकवायो आणि लिझाद विल्यम्स यांना गेलं घेतलं आहे.

ICC World CUP 2023 साठी टीम साऊथ आफ्रिका | टेम्बा बावुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी आणि रॅसी वन डेर डुसेन.