WPL 2023 | RCB चं आव्हान अजून कायम, अशी पोहचू शकते एलिमिनेटरपर्यंत

| Updated on: Mar 14, 2023 | 4:52 PM

आरसीबी वूमन्सचा सलग 5 सामन्यांमध्ये पराभव झालाय. मात्र त्यानंतरही स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात आरसीबी एलिमिनेटरपर्यंत पोहचू शकते, जाणून घ्या कशी.

WPL 2023 | RCB चं आव्हान अजून कायम, अशी पोहचू शकते एलिमिनेटरपर्यंत
Follow us on

मुंबई | वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्स टीमने सलग 4 सामने जिंकत कारनामा केला आहे. मुंबई या कामगिरीसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसऱ्या बाजूला रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची दुर्दशा झालीय. बंगळरुला या मोसमात आतापर्यंत विजयाची चव चाखता आलेली नाही. आरसीबीला सोमवारी दिल्ली कॅपिट्ल्सकडून 60 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आरसीबीचा हा या मोसमातील सलग पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आरसीबी आणि चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे.

यामुळे आरसीबीवर सोशल मीडियावर टीका करण्यात येत आहे. दरम्यान यानंतरही आरसीबीला एलिमिनेटरमध्ये जाण्याची संधी आहे. मात्र त्याआधी दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर आरसीबीची खेळाडू मेगन शूट हीने प्रतिक्रिया दिली.

“खोटं नाही बोलणार, पण आम्ही आमच्या अनेक चुका सुधारल्या. टॉस गमावणं चांगलं नव्हतं कारण पीट सपाट नाही. सामन्याच्या सुरुवातीला खेळपट्टी पूर्णपणे प्रतिकूल होती. परिणामी अनेक डॉट बॉल पडले, यामुळे आमच्या अडचणी वाढल्या”, अशी प्रतिक्रिया दिल्ली विरुद्धच्या पराभवानंतर मेगन शूट हीने दिली.

असं आहे समीकरण

आरसीबीच्या आणखी 3 मॅच बाकी आहेत. आरसीबीला हे तिन्ही सामने कोणत्याही परिस्थिती जिंकावे लागतील. थोडक्यात आरसीबीला 100 टक्के द्याचेच आहेत, मात्र त्यानंतरही त्यांचं भवितव्य हे इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. सलग 3 सामने जिंकल्यानंतर दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात आणि यूपीला पराभूत करायला हवं.

तसेच गुजरातने यूपीवर विजय मिळवला, तर आरसीबीला संधी मिळू शकते. आरसीबीसाठी असं सर्व जर-तरचं समीकरण आहे. हे अवघड जरी वाटत असलं तरी अशक्य नाही. त्यामुळे आरसीबीचं काय होतं, हे येत्या सामन्यातून स्पष्टच होईल.आरसीबीचा पुढील सामना हा 15 मार्च रोजी यूपी विरुद्ध खेळवण्यात येणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

मुंबईने खेळलेल्या 4 सामन्यात विजय मिळवलाय. यासह मुंबई पॉइंट्सटेबलमध्ये 8 पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबईचा नेट रन रेट हा +3.524 इतका आहे. तर त्या खालोखाल दिल्ली, यूपी, गुजरात आणि शेवटी आरसीबी आहे.

टीम आरसीबी | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.