
दिल्ली कॅपिट्ल्सने वूमन्स प्रीमिअर लीग 2025 हंगामातील चौथ्या सामन्यात बंगळुरुला विजयासाठी 142 धावांचं आव्हान दिलं आहे. दिल्लीला बंगळुरुच्या गोलंदाजांसमोर पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. बंगळुरुने दिल्लीला 3 चेंडूंआधी रोखलं. दिल्लीचं 19.3 ओव्हरम्ये 141 धावांवर पॅकअप झालं. दिल्लीच्या काही फलंदाजांचा अपवाद वगळता इतरांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना त्या खेळीचं मोठ्या धावसंख्येत रुपांतर करता आलं नाही. बंगळुरुच्या गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. त्यानंतर आता आरसीबीच्या फलंदाजांची वेळ आहे. आरसीबीचे फलंदाज दिल्लीच्या गोलंदाजीचा कसा सामना करतात? हे लवकरच स्पष्ट होईल.
दिल्लीसाठी जेमिमाह रॉड्रिग्स हीने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. जेमिमाहने 22 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 4 फोरसह 34 रन्स केल्या. मात्र तिला आणखी मोठी खेळी करता आली नाही. जेमिमाह व्यतिरिक्त सारा ब्राइस हीने 19 चेंडूत 2 चौकारांसह 23 धावांचं योगदान दिलं. ॲनाबेल सदरलँड हीने 19 धावा जोडल्या. कॅप्टन मेग लॅनिंग हीने 17 धावा केल्या. तर शिखा पांडे हीने 14 धावांची भर घातली. लेडी सेहवाग म्हणून प्रसिद्ध असलेली शफाली वर्मा हीने घोर निराशा केली. शफाली पहिल्याच बॉलवर आऊट (गोल्डन डक) झाली.
आरसीबीकडून रेणुका सिंह हीने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. रेणूकाने 4 ओव्हरमध्ये 5.80 च्या इकॉनॉमी रेटने 23 धावांच्या मोबदल्यात 3 विकेट्स घेतल्या. तसेच जॉर्जिया वेरेहम हीनेही तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कीम गर्थ आणि एकता बिष्ट या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत दिल्लीला ऑलआऊट केलं.
बंगळुरुसमोर 142 धावांचं आव्हान
Innings Break! #RCB put on a disciplined bowling to bundle out #DC for 141. 👏👏
Chase on the other side ⌛
Renuka Singh Thakur is now the purple cap holder 🔥
Scorecard ▶ https://t.co/CmnAWvkMnF#TATAWPL | #DCvRCB | @RCBTweets pic.twitter.com/ygbwwFBs0V
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 17, 2025
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मारिजान कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कॅप्टन), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे आणि रेणुका ठाकूर सिंग.