
वूमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. स्मृती मंधाना हीच्याकडे बंगळुरुच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर मेग लॅनिंगकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याचं आयोजन हे बडोद्यातील कोतंबी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. बंगळरुने टॉस जिंकला. कॅप्टन स्मृतीने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग हीनेही टॉस जिंकून फिल्डिंगचाच निर्णय घेतला असता, असं स्पष्ट केलं. दिल्लीने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केल्याची माहिती मेगने दिली. मारिजान कॅप आणि जेस जोनासेन या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर निकी प्रसाद आणि अॅलिस कॅप्सी या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर बंगळुरुने एकमेव बदल केला आहे. एकता बिश्त हीचं कमबॅक झालं आहे.
दरम्यान दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघांचा हा या हंगमातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी सलामीचा सामना जिंकत अप्रतिम सुरुवात केली आहे. आता दोन्ही संघ आमनेसामने आहेत. त्यामुळे कोणती 1 टीम सलग दुसरा सामना जिंकणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे दिल्ली सलग दुसरा सामना जिंकते की स्मृतीची आरसीबी टीम तसं करण्याासून रोखण्यात यशस्वी होते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
बंगळुरुने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@RCBTweets win the toss and elect to field against @DelhiCapitals
Updates ▶️ https://t.co/CmnAWvkMnF#TATAWPL | #DCvRCB pic.twitter.com/aHhCsxqUx8
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 17, 2025
दिल्ली कॅपिटल्स वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : मेग लॅनिंग (कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, जेस जोनासेन, मारिजाने कॅप, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, राधा यादव, अरुंधती रेड्डी आणि मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कॅप्टन), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, एकता बिश्त, जोशिता व्हीजे आणि रेणुका ठाकूर सिंग.