
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी पाचही संघांनी कंबर कसली आहे. चौथ्या पर्वात जेतेपदाचा मान मिळवण्यासाठी पाचही संघ मैदानात उतरणार आहेत. आतापर्यंत झालेल्या तीन पर्वात मुंबई इंडियन्सचं पारडं जड दिसून आलं आहे. दोन वेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. तर एकदा आरसीबीने जेतेपदावर नाव कोरलं आहे. नुकतंच वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली आणि पाचही संघ ठरले आहे. आता 9 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आता या स्पर्धेचं वेळापत्रक समोर आलं आहे. 28 दिवसात एकूण 22 सामने खेळले जातील. दोन डबलहेडर्स सामने वगळता इतर सर्व सामने संध्याकाळी 7 वाजता सुरु होतील. नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर प्राथमिक फेरी आणि पहिले दोन डबलहेडर्स खेळवले जातील, त्यानंतर स्पर्धेचा दुसरा भाग वडोदरा येथे खेळवला जाईल.
नवी मुंबईत साखळी फेरीतील अंतिम सामना 17 जानेवारी रोजी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. 18 जानेवारी रोजी विश्रांतीचा दिवस असेल. त्यानंतर वडोदरामध्ये एकूण 11 सामने खेळले जातील. पाच संघांच्या या लीगमध्ये, प्रत्येकी आठ सामने खेळतील. साखळी फेरीत टॉपला असलेल्या संघाला अंतिम फेरीत थेट खेळण्याची संधी मिळेल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेला संघ एलिमिनेटर सामना खेळेल. एलिमिनेटर सामना 3 फेब्रुवारी रोजी मंगळवारी आणि अंतिम सामना 5 फेब्रुवारी गुरुवारी होणार आहे.
मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रँट, अमेलिया केर, राहिल फिरदौस, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, साइका इशाक आणि मिली इलिंगवर्थ, हॅली मॅथ्यूज, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनीम इस्माइल, गुनालन कुलकर्णी, निकोला कॅरी, संस्कृती गुप्ता.