WPL 2026: दिल्ली कॅपिटल्समध्ये 16 खेळाडू, पण कर्णधार कोण? फ्रेंचायझी मालकाने स्पष्टचं सांगितलं की…
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी मेगा लिलाव पार पडला. पाचही फ्रेंचायाझी संघाला आवश्यक त्या खेळाडूंसाठी बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सने सर्व पैसे खर्च करत संघाची बांधणी केली. पण कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने एकूण 11 खेळाडूंवर बोली लावली. तसेच रिटेन केलेल्या 5 खेळाडूमुळे संघातील खेळाडूंची संख्या आता 16 झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सने सर्वच्या सर्व म्हणजे 15 कोटी रुपये खर्च केले. अजूनही दोन स्लॉट दिल्ली कॅपिटल्सकडे शिल्लक आहेत. वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेसाठी दिल्ली कॅपिटल्सने शफाली वर्मा 2.2 कोटी, जेमिमा रॉड्रिग्स 2.2 कोटी, मारिझाने केप 2.2 कोटी आणि एनाबेल सदरलँड 2.2 कोटी आणि निकी प्रसादला 50 लाख रूपये देऊन रिटेन केलं होतं. त्यानंतर उर्वरित 5.7 कोटी रुपयांसह मेगा लिलावात उतरले होते. या रकमेत त्यांनी श्री चरनी, चिनेल हेनरी, लॉरा वोल्वार्ट, स्नेह राणा, मिन्नू मणि, तानिया भाटिया, लिज़ेल ली, नंदनी शर्मा, दिया यादव, लूसी हॅमिल्टन, ममता मढिवाल यांना रिटेन केलं.
मेगा लिलावात श्री चरणी, चिनेल हेनरी यांच्यासाठी 1.30 कोटींची बोली लावली. तर लॉरा वॉल्वार्ट हिच्यासाठी 1.10 कोटी खर्च केले. स्नेह राणा 50 लाख, मिन्नू मणी 40, तानिया भाटिया 30 लाख, लिजेल ली 30 लाख, नंदिनी शर्मा 20, दिया यादव 10, लूसी हॅमिल्टन 10 लाख आणि ममता मढिवाल हिच्यासाठी 10 लाख रुपये मोजले. मेगा लिलावादरम्यान लॉरा वॉल्वार्टला संघात घेतल्याने तिच्याकडे संघाची धुरा जाईल असं क्रीडाप्रेमींना वाटलं. पण फ्रेंचायझीचे मालक पार्थ जिंदाल यांच्या मनात काही वेगळंच सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पुढचा कर्णधार कोण असेल याबाबत त्यांनी हिंट देऊन टाकली. त्यांनी विदेशी कर्णधार नसेल हे स्पष्ट केलं.
Laura Wolvaardt as Delhi Capitals captain?
Parth Jindal: “No, no. We are very clear that we will have a Indian captain” pic.twitter.com/hv2QEPg3sl
— Sahil Malhotra (@Sahil_Malhotra1) November 27, 2025
पार्थ जिंदाल यांनी सांगितलं की, भारतीय खेळाडूंना आपल्या फ्रेंचायझीचं कर्णधार करणार आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार शफाली वर्मा किंवा जेमिमा रॉड्रिग्स होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कारण या दोन खेळाडूंवर विश्वास असल्यानेच त्यांना रिटेन केलं होतं. आता लिलाव प्रक्रिया संपली असून पुढच्या आठवड्यात कर्णधाराची घोषणा होईल. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा 9 जानेवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेच्या एक महिना आधी कर्णधाराची घोषणा केली जाईल. दुसरीकडे, सलग तीन पर्वात दिल्ली कॅपिटल्सने अंतिम फेरी गाठली होती. पण तिन्ही वेळेस पदरी निराशा पडली. आता चौथ्या जेतेपदाच्या आशेने संघ मैदानात उतरेल.
