WTC Final 2023 : जडेजाला खेळवायचं होतं तर ‘या’ खेळाडूला बसवायचं, गावसकरांनी चालू कॉमेट्रीमध्ये रोहितला झाडलं!

| Updated on: Jun 07, 2023 | 8:35 PM

Sunil Gavaskar on R Ashwin : माजी क्रिकेटपटूंनीही  टीम इंडियाच्या आश्विनला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कॉमेंट्रीवेळी बोलताना माजी खेळाडी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी आश्विनला कोणत्या खेळाडूच्या जागी संघात घ्यायला हवं होतं सांगितलं आहं. 

WTC Final 2023 : जडेजाला खेळवायचं होतं तर या खेळाडूला बसवायचं, गावसकरांनी चालू कॉमेट्रीमध्ये रोहितला झाडलं!
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा फायनल 2023 सामना सुरू असून टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने सर्वांना चकित करून टाकणारा निर्णय घेतला आहे. फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये आर. आश्विनचा समावेश नाही. महत्त्वाच्या  सामन्यात आर. आश्विनचा संघात समावेश न केल्याने क्रिकेट वर्तुळात रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंटवर जोरदार टीका होताना दिसत आहे. माजी क्रिकेटपटूंनीही  टीम इंडियाच्या आश्विनला बाहेर बसवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत कॉमेंट्रीवेळी बोलताना माजी खेळाडी लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी आश्विनला कोणत्या खेळाडूच्या जागी संघात घ्यायला हवं होतं सांगितलं आहं.

काय म्हणाले सुनील गावसकर?

तुम्ही इतक्या महत्त्वाच्या सामन्यात आयसीसीच्या रँकिंगमध्ये नंबर एकवर असलेल्या बॉलरला  न खेळवण्याचं ठरवलं हा निर्णय माझ्या समजण्यापलीकडचा आहे. ऑस्ट्रेलियाची बॅटींग ऑर्डर पाहता आश्विनला संघात घ्यायला हवं होतं, असं सुनील गावसकर यांनी म्हटलं आहे. इतकंच नाहीतर आर. आश्विनला प्लेइंग 11 मधील वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या जागी आश्विनला संघात घ्यायला पाहिजे होतं, असं गावसकर म्हणाले.

आश्विनला संघात न घेण्यामागे खेळपट्टी हे कारण असू शकते. खेळपट्टीवर गवत असल्याने गोलंदाजांना मदत मिळते त्यामुळे संघाने जडेजाला संधी देत आश्विनला प्लेइंग 11 मध्ये स्थान न देण्याचा निर्णय घेतला असावा.

ऑस्ट्रेलियानेही या खेळपट्टीवर तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड वेगवान आणि नॅथन लियॉन फिरकीपटू आहेत.
ऑस्ट्रेलियाकडे कॅमेरून ग्रीनच्याहा अष्टपैलू खेळाडू आहे, जे वेगवान गोलंदाजही आहे. त्यासोबतच मार्नस लबुशेन पार्ट हा टाईम फिरकी गोलंदाजीही करू शकतो. त्यामुळे आता आश्विनला न घेतल्याने संघाला फटका बसतो की नाही हे पहिल्या दिवसाच्या खेळावरून लक्षात येईल.