Rohit Sharma : आर. अश्विनला का खेळवलं नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!

| Updated on: Jun 07, 2023 | 9:13 PM

आर. अश्विनला प्लेइंग 11 त्याला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अश्विनला संघात का घेतलं नाही यावर कर्णधार रोहित शर्मा याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 

Rohit Sharma : आर. अश्विनला का खेळवलं नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023  सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या फायनल सामन्यासाठी टीम इंडियासाठी एकट्याच्या जीवावर मॅच काढणाऱ्या खेळाडूला संघात न घेतल्याने सर्वांना धक्का बसला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऑल राऊंडर आर. अश्विन आहे. प्लेइंग 11 त्याला स्थान न दिल्याने टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अश्विनला संघात का घेतलं नाही यावर कर्णधार रोहित शर्मा याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला?

अश्विनसारख्या खेळाडूला संघातून वगळण हा अवघड निर्णय होता. अनेक वर्षांपासून संघाकडून खेळताना त्याने मॅचविनिंग कामगिरी केली आहे. काहीवेळा परिस्थिती पाहता असे निर्णय घ्यावे लागतात. फायनल सामन्यामध्ये चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाजांसह संघ मैदानात उतरवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला असल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

भारताकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर आणि फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा हे चार वेगवान गोलंदाज आहेत. अजिंक्य रहाणे वर्षभरानंतर कसोटी इलेव्हनमध्ये परतला आहे. केएस भरतला यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळालं आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.