Yuzvendra Chahal IPL 2022 Hat Trick Video : युजवेंद्र चहलनं हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला, खास स्टाईलमध्ये सेलिब्रेशन

| Updated on: Apr 19, 2022 | 11:20 AM

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये युजवेंद्र चहलची (Yuzvendra Chahal) शानदार खेळी पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना, त्याने कोलकाता नाईट रायडर्सला अक्षरश: लोळवलं. चहलनं पाच बळी घेत राजस्थान रॉयल्सला (Kolkata Knight Riders) विजय तर मिळवून दिला.

Yuzvendra Chahal IPL 2022 Hat Trick Video : युजवेंद्र चहलनं हॅट्ट्रिक घेत इतिहास रचला, खास स्टाईलमध्ये सेलिब्रेशन
Yuzvendra Chahal hat trick celebration
Image Credit source: Twitter / @WisdenIndia
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये युजवेंद्र (Video साठी युजवेंद्रवर क्लिक करा) चहलची (Yuzvendra Chahal) शानदार खेळी पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सकडून गोलंदाजी करताना, त्याने कोलकाता नाईट रायडर्सला अक्षरश: लोळवलं. चहलनं पाच बळी घेत राजस्थान रॉयल्सला (Kolkata Knight Riders) विजय तर मिळवून दिलाच पण हॅट्ट्रिक घेत अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शनही केलं. चहलनं हॅट्ट्रिक घेतल्यानंतर भर मैदानात त्याचीच मिम स्टाईल पुन्हा एकदा क्रिएट केली. यात तो रिलॅक्स होत, आराम करताना दिसतोय. ती नेमकी स्टाईल काय आहे याची माहितीही नंतर त्यानं बोलताना दिली. पण चहलच्या हॅट्ट्रिकमुळे मात्र कोलकाता नाईट रायडर्सला पराभवाचा सामना करावा लागला.

राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सामना अंतिम टप्यात आला असतानाच राजस्थानच्या कर्णधाराने चहलच्या हाती चेंडू सोपवला. त्याने 17 व्या षटकात कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर, शिवम मावी आणि पॅट कमिन्सला तंबूत परत पाठवलं. आयपीएलच्या इतिहासातली ही 21 वी हॅट्ट्रिक आहे. बरं चहलनं टिपलेले तीनही मोहरे हे केकेआरचे तगडे फलंदाज आहेत. पॅट कमिन्सला बाद करत त्याने हॅट्ट्रिक पूर्ण केली त्यावेळी चहलचं सेलिब्रेशन पाहण्यासारखं होतं. चहल खूश होत एकदम आराम करण्याच्या पोजिशनमध्ये मैदानात राजासारखा बसला. त्यावेळेस त्याच्या सहकाऱ्यांनीही याचा आनंद घेतला.

2019 ते 2022

युजवेंद्र चहलचा तो प्रसंग आहे 2019 सालचा. त्यावेळेस टीम इंडिया श्रीलंकेत वर्ल्डकपची मॅच खेळत होती. युजवेंद्र चहलचा मात्र प्लेईंग एलेव्हनमध्ये समावेश नव्हता. त्यामुळे तो सीमारेषेच्या पलिकडे डोळ्यांवर गॉगल लावून घरात लोडवर निवांत पडावं तसा पडलेला होता. चहलचा हा अंदाज त्यावेळेस चाहत्यांच्या नजरेतून सुटला नाही. मॅचपेक्षाही चर्चा होती ती त्याच्या रुबाबदारपणाची. त्याचे मिम्स व्हायरल झाले. केकेआरविरोधातीस सामना संपल्यानंतर प्रजेंटेशन सेरेमनीत चहलनेच खास सेलिब्रेशनचा उल्लेख केला.

सामन्याचं काय झालं?

चहलच्या अंदाजाची चर्चा खूप झाली. आता सामन्याचं काय झालं ते पाहूया. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक गमावली, श्रेयस अय्यरने त्यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर राजस्थानने पाच गड्यांच्या बदल्यात 217 धावांचा डोंगर उभा केला. जॉस बटलरने 61 चेंडूत 103 धावा ठोकल्या. त्यात 9 चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. त्यानंतर संजू सॅमसनने 38 आणि हेटमायरनं नाबाद 26 धावांचं योगदान दिलं. केकेआरकडून सुनील नरेननं दोन विकेट घेतल्या.

राजस्थान रॉयल्सने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची धमछाक झाली. त्यात एकट्या चहलनं पाच विकेट घेतल्या. परिणामी 19.4 षटकात 210 धावांवर कोलकात्याचा संपूर्ण संघ बाद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 85 धावा फटकावल्या. तर एरॉन फिंचनं 58 धावांचं योगदान दिलं. आयपीएलमध्ये पदापर्ण करणाऱ्या ओबेद मॅक्कॉयनं दोन विकेट घेतल्या. दरम्यान पाच बळी घेणाऱ्या चहलने चार षटकात 40 धावा दिल्या.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : जॉस बटलर 272 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर,पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे कायम

RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर

RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त