Dhanshree Verma | ‘श्रेया’ने ‘गेम’ केला, धनश्री आणि श्रेयसचं जुळलं?

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा आणि स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर यांच्या वाढत्या जवळीकीमुळे सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

Dhanshree Verma | श्रेयाने गेम केला, धनश्री आणि श्रेयसचं जुळलं?
| Updated on: Apr 10, 2023 | 7:40 PM

मुंबई | टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा आणि क्रिकेटर श्रेयस अय्यर हे दोघे कायम विविध कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनेकदा श्रेयस आणि धनश्री एकत्र दिसले आहेत. दोघांच्या वाढत्या जवळीकीबबात नेटकऱ्यांकडून यांच्यात काहीतरी शिजतंय, असा अंदाज बांधला जात आहे. अय्यरचा फोटो धनश्री वर्मा हीने इंस्टाग्रामवर स्टोरीतून शेअर केला. धनश्रीने या फोटोवर किसवाली इमोजी लावली आहे.

धनश्री वर्मा सोशल मीडियावर कायम एक्टीव्ह असते. धनश्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. धनश्रीने नुकतेच श्रेयस अय्यर याच्यासोबतचे काही फोटो शेअर केले होते.

हा व्हायरल फोटो इफ्तार पार्टीतील असल्याचं म्हटलं जात आहे. या फोटोत श्रेयस अय्यर याची बहिण श्रेष्ठाही आहे. या फोटोत श्रेयस शेवटी एका कोपऱ्यात उभा असल्याचं दिसून येत आहे.

धनश्रीने हा फोटो शेअर करताना “माय क्युटीज” असं कॅप्शन देत किस वाली इमोजी वापरली आहे.

दरम्यान धनश्री आणि श्रेयस एकत्र दिसण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी हे दोघे टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूर याच्या लग्नालाही एकत्र होते.

शार्दुल ठाकूर याच्या लग्नात


यावेळेस टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका सजदेह हे दोघे उपस्थित होते. हा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.तेव्हाही श्रेयस आणि धनश्री यांची चर्चा रंगली होती.