ZIM vs SA : दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, झिंबाब्वेचा 5 विकेट्सने धुव्वा

Zimbabwe vs South Africa 1st Match Result : दक्षिण आफ्रिकेने झिंब्बावे विरूद्धच्या टी 20i मालिकेत विजयी सुरुवात केली आहे.

ZIM vs SA : दक्षिण आफ्रिकेची विजयी सलामी, झिंबाब्वेचा 5 विकेट्सने धुव्वा
ZIM vs SA 1st T20i
| Updated on: Jul 15, 2025 | 1:09 AM

दक्षिण आफ्रिकेने त्रिसदस्यीय मालिकेतील पहिल्या टी 20i सामन्यात झिंबाब्वेवर 5 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली आहे. यजमान झिंबाब्वेने कर्णधार सिकंदर रझा याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेसमोर 142 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 25 बॉलआधी 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने 15.5 ओव्हरमध्ये 5 विकेट्सच्या मोबदल्यात 142 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेने यासह ट्राय सीरिजमध्ये शानदार सुरुवात केली. आता या मालिकेतील दुसरा सामना हा 16 जुलैला दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या विजयात रुबीन हर्मन याने प्रमुख भूमिका बजावली. रुबीनने 37 बॉलमध्ये 5 फोर आणि 1 सिक्ससह 45 रन्स केल्या. बेबी एबी म्हणून प्रसिद्ध असेल्या डेवाल्ड ब्रेव्हीस याने 17 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह स्फोटक 41 रन्स केल्या.

त्याआधी रिझा हेंड्रीक्स याने 11 तर कॅप्टन रॅसी वॅन डुसेन याने 16 धावा जोडल्या. तर कॉर्बिन बॉश आणि जॉर्ज लिंडे या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयापर्यंत पोहचवलं. कॉर्बिनने 15 बॉलमध्ये नॉट आऊट 23 रन्स केल्या. तर जॉर्ज 3 धावांवर नाबाद परतला. झिंबाब्वेकडून रिचर्ड नगारावा याने 3 विकेट्स घेतल्या. तर ट्रेव्हर ग्वांडू याने दक्षिण आफ्रिकेच्या दोघांना बाद केलं.

सामन्यातील पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेसाठी कॅप्टन सिकंदर रझा याने 38 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 54 रन्स केल्या. ब्रायन बेनेट याने 28 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 30 धावा केल्या. तर रायन बर्ल याने 20 चेंडूत 29 धावा केल्या. झिंबाब्वेसाठी या त्रिकुटाने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. मात्र या तिघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दक्षिण आफ्रिकेसाठी जॉर्ज लिंडे याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडी, नांद्रे बर्गर आणि नकाबायोम्झी पीटर या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट्स घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेची विजयी सुरुवात

दक्षिण आफ्रिकेकडे सलग दुसर्‍या विजयाची संधी, न्यूझीलंड रोखणार?

दरम्यान दक्षिण आफ्रिका या मालिकेतील आपला आणि एकूण दुसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना बुधवारी 16 जुलैला होणार आहे.आता दक्षिण आफ्रिका या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवणार की न्यूझीलंड तसं करण्यापासून रोखणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.