AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बकवास थांबवा.. भारताबद्दल ट्रम्प यांच्या विधानावर इराणचा पलटवार, 17 सेकंदांचा व्हिडिओ टाकत…

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला 'नरक' संबोधल्यामुळे गदारोळ माजला असून, आपल्या मित्राबद्दल अपशब्द वापरल्याने इराणही चांगलाच भडकला आहे. इराणी दूतावासाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ट्रम्प यांनाच सुनावलं आहे.

बकवास थांबवा.. भारताबद्दल ट्रम्प यांच्या विधानावर इराणचा पलटवार, 17 सेकंदांचा व्हिडिओ टाकत...
भारतविरोधी वक्तव्य ट्रम्पना पडलं महाग
| Updated on: Apr 24, 2026 | 11:59 AM
Share

वादग्रस्त वक्तव्य, सर्वांची झोप उडवणारी विधानं आणि घोषणा करण्यासाठी प्रसिद्ध असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता तर कळस गाठला आहे. भारतासह इतर काही देशांना नरक संबोधणारी पोस्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपोस्ट केल्याने संतापाचा भडका उडाला असून नवा वाद निर्माण झाला आहे. ट्रम्प यांच्या विधानाचा जगभरातून निषेध होत असून भारतानेही नाराजी दर्शवली आहे. मात्र आपल्या मित्राबद्दल वापरलेले शब्द ऐकून आता इराणही भडकला असून युद्धविरामादरम्यानच इराणने मोठं पाऊल उचलत ट्रम्प यांना थेट सुनावलं आहे.

मुंबईतील इराणी वाणिज्य दूतावासाने ट्रम्प यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेत, त्यांच्यावर टीका केली आहे. इराणने ट्रम्प यांना भारताचे सौंदर्य पाहण्याचा सल्ला दिला आहे. एवढंच नव्हे तर भारताला कमी लेखणाऱ्या ट्र्म्प यांना, त्यांच्या देशातूनही टीकेचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षानेही या विधानावरून ट्रम्प यांच्यावर तोंडसुख घेतलं आहे.

इराणचा ट्रम्पना सल्ला

इराणी दूतावासाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 16 सेकंदांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची दोन भिन्न रूपं दाखवण्यात आली आहेत. एका बाजूला मुंबईच्या चमचमणाऱ्या गगनचुंबी इमारती, महामार्ग आणि शहरी झगमगाट दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला, धुक्याने वेढलेले डोंगर, वाहणारे धबधबे, तलाव आणि हिरव्यागार पायवाटांचं या व्हिडीओत दर्शन होत आहे.

त्या पोस्टमध्ये ट्रम्प यांना ‘कल्चरल डिटॉक्स’ करण्याचा, अर्थात त्यांच्या विचारसरणीत बदल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इराणी दूतावासाने हा व्हिडीओ पोस्ट करतानाच, ‘कधी भारतात येऊन बघा, मग बोला’ असंही त्यासोबत लिहीलं आहे.

डेमोक्रॅटिक पार्टीही भडकली

भारतासह काही देशआंना नरक म्हणणाऱ्या ट्रम्प यांचं हे विधान कोणालाच पटलेलं नाही. अमेरिकेच्या डेमोक्रॅटिक पक्षानेही ट्रम्प यांच्या ‘नरक’ वक्तव्यावर निशाणा साधला आहे. या पक्षाच्या प्रतिनिधींनी ट्रम्प यांच्यावर ‘वंशवादी कचरा’ पसरवल्याचा आरोप केला आहे. “अमेरिकन जनता संघर्ष करत आहे, आणि ते (ट्रम्प) सोशल मीडियावर वंशवादी मूर्खपणा पसरवण्यात व्यस्त आहेत. ते अध्यक्षपद एखाद्या रिॲलिटी टीव्ही शोप्रमाणे चालवत आहेत. ही एक नाजूक वेळ आहे आणि आपल्या देशाला अधिक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.” असं एका प्रतिनिधीने एक्सवर ( पूर्वीच ट्विटर) लिहिलं आहे.

काय म्हणाले होते ट्रम्प ?

खरंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्थलांतरितांविषयीचे एक पत्र पुन्हा पोस्ट केलं होतं, “इथे (अमेरिकेत) जन्मलेलं मूल लगेचच नागरिक बनतं. मग ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला चीन, भारत किंवा पृथ्वीवरील इतर कुठल्यातरी नरकातून येथे घेऊन येतात.” असं त्यावर लिहीलं हतं.

एकीकडे मध्य पूर्वेत तणाव वाढत आहे. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भारताने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचा सल्ला दिला असून, संभाव्य मोठ्या हल्ल्याचा संकेत दिला आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल