
इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मलान सध्या टी -20 मध्ये जगातील क्रमांक एकचा फलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये त्याची बॅट गेल्या एक वर्षापासून चांगलीच तळपतीय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही डेव्हिड मलान कमी नाही. कौंटी चॅम्पियनशिप 2021 स्पर्धेत यॉर्कशायरकडून खेळताना त्याचं केवळ एका धावेने दुहेरी शतक हुकलं. या दरम्यान त्याने विक्रमही केले. यासह त्याने इंग्लंडच्या कसोटी संघात आपली दावेदारी पक्की केली आहे.

डेव्हिड मलानने ससेक्सविरुद्धच्या सामन्यात 199 धावा केल्या. त्याचं केवळ एका धावाने दुहेरी शतक हुकलं. त्याला 199 धावांवर जॅक कारसनने क्लिन बोल्ड केले. तंबूत परण्यापूर्वी मलानने 199 धावांच्या खेळीत 22 चौकार आणि दोन षटकार लगावले. त्याच्या खेळीमुळे यॉर्कशायरने 558 धावांची विशाल स्कोअर केला.

गेल्या एका वर्षात 33 वर्षीय डेव्हिड मालनचा हा दुसरा प्रथम श्रेणी सामना होता. तो ऑगस्ट 2020 मध्ये डर्बशायर विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने दुहेरी शतक ठोकले. त्यावेळी त्याने 219 धावांची डावांची खेळी केली होती. अशा परिस्थितीत, एक वर्षानंतर प्रथम श्रेणी क्रिकेट खेळल्यानंतरही मलानच्या फॉर्ममध्ये कोणतीही कमी जाणवली नाही.

199 धावांवर डेव्हिड मालन त्याच्या पहिल्या श्रेणी कारकीर्दीत दुसऱ्यांदा बाद झाला. 2019 मध्ये डर्बशायरविरुद्ध 199 धावांवर तो प्रथम बाद झाला होता. त्यावेळी तो मिडिलसेक्सकडून खेळायचा. आता ससेक्सविरुद्ध खेळताना जॅक कारसनने त्याला क्लिन बोल्ड केलं. तो दुसरा क्रिकेटर आहे जो 199 धावांवर दोन वेळा तंबूत परतला आहे.मलानपूर्वी, नॉटिंगहॅमशायरचा जेसन गॅलेन 2005 साली 199 मध्ये दोनदा बाद झाला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गॅलियन एकाच मोसमात दोन्ही वेळा 199 धावांवर रनआऊट झाला होता.

डेव्हिड मलान इंग्लंडकडूनही कसोटी क्रिकेट खेळला आहे. त्याने 15 कसोटी सामने खेळले असून त्याच्यात 724 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि सहा अर्धशतके आहेत. मलानने 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण केले. पण ऑगस्ट 2018 पासून तो संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत ससेक्सविरुद्धच्या सामन्यात 199 धावा करुन त्याने कसोटी संघाचं दार ठोठावलं आहे.