
मेलबर्न : टीम इंडियाचा (Team India) भरवशाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (yuzvendra chahal) नेहमी विविध कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. परंतु सद्या तो त्यांच्या बायकोच्या एका पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. टीम इंडियातील खेळाडू त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करीत असतात. त्यावर चाहते देखील मजेशीर कमेंट करीत असतात.
युझवेंद्र चहल सध्या ऑस्ट्रे्लियात विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी टीम इंडिया सोबत आहे. परंतु त्याला दोन मॅचमध्ये संधी मिळाली नाही. नेदरलॅंडविरुद्धच्या मॅचमध्ये तो खेळाडूंना पाणी देण्यासाठी आला होता. त्यावेळचा सुद्धा त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सुद्धा इंस्टाग्रामवर अधिक सक्रीय असते. धनश्री वर्माचे सुद्धा अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या धनश्री वर्मा ऑस्ट्रेलियात आहे. तिथं ती अनेक ठिकाणी प्रवास करीत असताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियात बीचवर काढलेला एक फोटो धनश्रीने शेअर केला आहे.
हा फोटो काही क्षणात व्हायरल झाला आहे. तिथं धनश्री वर्माला अधिक चाहते कमेंट करुन प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने धनश्री वर्माच्या फोटोवर युजीभाईंची बॉडी बोलली तर ओ.पी.अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या चाहत्याने पैसे असतील तर काही होऊ शकत नाही असं आहे का ? अशी कमेंट केली आहे.