धोनीची विकेट आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली : सचिन तेंडुलकर

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईच्या विजयासाठी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विकेट हा आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला, असं मुंबईचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने म्हटलंय. सचिन […]

धोनीची विकेट आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली : सचिन तेंडुलकर
Follow us on

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. मुंबईच्या विजयासाठी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची विकेट हा आमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला, असं मुंबईचा मेंटॉर सचिन तेंडुलकरने म्हटलंय.

सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्समधील युवा खेळाडूंसह जसप्रीत बुमरा, लसिथ मलिंगा यांच्या कामगिरीचंही कौतुक केलं. पण या सामन्यात धोनीची विकेट ही टर्निंग पॉईंट होती, असं मत सचिनने व्यक्त केलं. जसप्रीत बुमराने चार षटकांमध्ये केवळ 14 धावा दिल्या, तर लसिथ मलिंगाने अखेरच्या थरारक षटकामध्ये शार्दूल ठाकूरची विकेट घेऊन विजयावर शिक्कामोर्तब केलं.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ बाद 149 धावा केल्या होत्या. या सामन्याने अनेकदा बाजू बदलली. अखेरच्या षटकापर्यंत लांबलेल्या या सामन्यात चेन्नईची बाजू मजबूत दिसत होती. पण शेन वॉट्सनला धावबाद केलं आणि पारडं पुन्हा एकदा पलटलं. चेन्नईने 7 बाद 148 धावाच केल्या आणि मुंबई इंडियन्सने केवळ एका धावाने विजय मिळवला.

चेन्नईच्या डावात 13 व्या षटकात महेंद्रसिंह धोनी केवळ दोन धावा करुन माघारी परतला. ईशान किशनने थेट स्टम्पवर निशाणा साधला आणि धोनीला माघारी जावं लागलं. दरम्यान, धोनीचे चाहते तिसऱ्या पंचांच्या या निर्णयाशी सहमत नव्हते. धोनी माघारी परतल्यानंतर शेन वॉट्सनवर दबाव वाढला होता. या दबावात खेळी करताना धावबाद झाला. शेन वॉट्सनने 80 धावा केल्या, पण त्याला विजय मिळवून देता आला नाही.

सचिनने युवा फिरकीपटू गोलंदाज राहुल चहरचंही कौतुक केलं. मी पहिल्या सामन्यानंतरच चहरविषयी मत व्यक्त केलं होतं आणि तो चांगला गोलंदाज ठरला. स्पिनर्सने चांगली गोलंदाजी केली, असं सांगताना सचिनने हार्दिक पंड्याचंही कौतुक केलं. पंड्याने अनेक वेळा महत्त्वपूर्ण भूमिका निभावली, असं सचिन म्हणाला.

VIDEO : धोनीला बाद दिल्यानंतर चाहत्यांचा संताप