IND vs NZ: दुसरी कसोटी पण भारत जिंकणार नाहीच…पत्रकार परिषदेत ध्रुव जुरेल असं का म्हणाला?

Dhruv Jurel On IND vs NZ 2nd Test: भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे, हा सामना भारत जिंकणार की नाही यावर आता ध्रुव जुरेलने विधान केले आहे.

IND vs NZ: दुसरी कसोटी पण भारत जिंकणार नाहीच...पत्रकार परिषदेत ध्रुव जुरेल असं का म्हणाला?
dhruv jurel
Image Credit source: google
| Updated on: Nov 29, 2026 | 4:37 PM

Dhruv Jurel Press Conference: भारतीय फलंदाज ध्रुव जुरेलचा विश्वास आहे की, हॅगली ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही अशी त्याला अपेक्षा आहे. जुरेलने याची तुलना वेलिंग्टनमधील पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवसाच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीशी केली.

भारताच्या पहिल्या डावात शानदार ८८ धावा करणाऱ्या जुरेलने, खालच्या फळीतील फलंदाज आकाश दीप आणि गुरनूर ब्रार यांच्यासोबत उपयुक्त धावा जोडल्या. “खेळपट्टी कोरडी झाली होती आणि कुकाबुरा चेंडू जुना झाला होता, त्यामुळे फलंदाजी करणे सोपे झाले होते. माझा विश्वास आहे की पाचव्या दिवसापर्यंत खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक सोपी होईल आणि गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही, या परिस्थितीत भारत दुसरी कसोटी अनिर्णित राखू शकतो,” असे जुरेल म्हणाला.

Loading...

तो म्हणाला, “संघासाठी योगदान देता आल्याने छान वाटते. जेव्हा खालच्या फळीतील फलंदाज क्रीजवर येतात, तेव्हा मी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे की गोलंदाजांना बचावात्मक खेळायला आवडत नाही. ते सुद्धा चांगली फलंदाजी करू शकतात, हा आत्मविश्वास आपल्याला त्यांना द्यावा लागतो.  जेव्हा खालच्या फळीतील फलंदाज आक्रमकता दाखवतात, तेव्हा विरोधी गोलंदाजांसाठी ते किती निराशाजनक असू शकते.”

तो म्हणाला, “आधीचा चेंडू विसरून पुढच्या चेंडूवर लक्ष केंद्रित करणे नेहमीच चांगले असते. प्रत्येक चेंडू, प्रत्येक सत्र, एकेक करून खेळणे महत्त्वाचे आहे. SENA देशांमध्ये खेळून चांगली कामगिरी करणे हे माझे स्वप्न होते. माझे कुटुंब पहिल्यांदाच येथे आले आहे आणि त्यांना खूप आनंद झाला. मी शतक झळकावले असते तर अजूनच छान वाटले असते. आकाशच्या दुखापतीबद्द सांगायचे तर झोप येत होती आणि थोडी वेदनाही होत होती. वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत आहे.”

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us