
दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2025 एलिमिनेटर सामन्यात वेस्ट दिल्ली लायन्सचा कॅप्टन नीतीश राणाने जबरदस्त बॅटिंग केली. साऊथ दिल्ली सुपरस्टार्स विरुद्ध त्याने केवळ 42 चेंडूत शतक ठोकून आपल्या टीमला या लीगच्या क्वालिफायर-2 मध्ये पोहोचवलं. या दरम्यान त्याने 15 सिक्स मारले. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मध्ये नितीश राणा राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. त्यांनी डीपीएल 2025 लीगमध्ये साऊथ दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला सोडलं नाही. त्यांची जोरदार धुलाई केली. या दरम्यान साऊथ दिल्ली सुपरस्टार्जचा स्पिनर दिग्वेश राठी सोबत त्याचं भांडण झालं. विषय मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये हा एलिमिनेटरचा सामना झाला. साउथ दिल्ली सुपरस्टार्जने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 201 रन्स केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट दिल्ली लायन्सने 17 चेंडू राखून सात विकेटने सामना जिंकला. वेस्ट दिल्लीचा कॅप्टन नीतीश राणाने केवळ 42 चेंडूत शतक ठोकून हा सामना एकतर्फी केला. त्याने 55 चेंडूत 8 चौकार आणि 15 षटकारांसह नाबाद 134 धावा केल्या. त्याने साउथ दिल्लीच्या गोलंदाजांची भरपूर धुलाई केली. नीतीशने दिग्वेश राठीच्या एका ओव्हरमध्ये तीन सिक्स मारले.
शानदार बॅटिंग
या ओव्हरमध्ये दिग्वेश राठीने 20 धावा दिल्या. नीतीश राणाशिवाय विकेटकीपर फलंदाज क्रिस यादवने 22 चेंडूत 1 चौकार आणि 3 षटकारांसह 31 रन्स केल्या. मयंक गोसाईंने नाबाद 15 रन्स केल्या. साउथ दिल्लीकडून सुमित कुमार बेनीवालने दोन विकेट घेतल्या. अमन भारतीला एक विकेट मिळाला. त्याआधी साउथ दिल्लीच्या फलंदाजांनी शानदार बॅटिंग केली.
एका ओव्हरमध्ये 3 सिक्स
वेस्ट दिल्ली लायन्सच्या इनिंग दरम्यान नीतीश राणा वेगाने धावा करत होता. त्याने साऊथ दिल्लीचा गोलंदाज दिग्वेश राठीच्या गोलंदाजीवर वेगाने धावा बनवल्या. या दरम्यान त्याने एका ओव्हरमध्ये 3 सिक्स मारले. त्यामुळे दिग्वेश राठी चिडला. त्यावेळी दिग्वेश राठी गोलंदाजीला येत असताना नितीशा राणा स्ट्राइकवर होता.
मध्यस्थी करुन दोघांना शांत केलं
दिग्वेश गोलंदाजीसाठी धावला. पण त्याने चेंडू टाकला नाही. त्यावेळी नितीशला स्विप शॉट मारायचा होता. पुढच्या चेंडूवर दिग्वेशला चेंडू टाकायचा होता. पण नितीश मागे गेला. त्यानंतर दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. बराचवेळ दोघांमध्ये वादावादी सुरु होती. या दरम्यान नितीशने दिग्वेशला बॅट सुद्धा दाखवली. अंपायर आणि अन्य खेळाडूंनी मध्यस्थी करुन दोघांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दिग्वेश राठी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 2 ओव्हरमध्ये 39 धावा दिल्या.