ENG vs NZ : इंग्लंडला मोठा झटका, या कारणामुळे जोफ्रा आर्चर कसोटी संघाबाहेर!

| Updated on: May 18, 2021 | 8:14 AM

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. (Jofra Archer Out Against New Zealand Test Series)

ENG vs NZ : इंग्लंडला मोठा झटका, या कारणामुळे जोफ्रा आर्चर कसोटी संघाबाहेर!
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर...
Follow us on

मुंबई : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या (NG vs NZ) कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंबंधीची अधिकृत माहिती दिली आहे. काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ससेक्सकडून खेळाताना आर्चरच्या कोपराला दुखापत झाल्याने त्याला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळता येणार नाही. आर्चरच्या रुपाने इंग्लंड संघाला जबर धक्का बसला आहे. (England Star bowler Jofra Archer Out Against New Zealand Test Series)

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आर्चरची माघार

यंदाच्या आयपीएलमधून कोपराला झालेल्या दुखापतीमुळे आर्चरने माघार घेतली होती. आता त्याच दुखापतीने पुन्हा डोकं वर काढलं आहे. मागील काही दिवसांपूर्वी तो दुखापतीतून सावरला होता. त्यानंतर त्याने काऊंटी चॅम्पियनशीपच्या ससेक्स संघाकडून पुनरागमन केलं होतं. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी त्याला माघार घ्यावी लागली आहे.

कोपराला दुखापत

दुखापतीनंतर पुनरागमन करताना आर्चरने ससेक्सकडून खेळताना पहिल्या डावांत 29 रन्स देऊन महत्त्वाच्या दोन बॅट्समनला तंबूत धाडलं. यावेळी तो जुन्या अंदाजात पाहायला मिळाला. मात्र दुसऱ्या डावांत तो केवळ 5 ओव्हरच टाकू शकला. कोपराला सूज आल्याचं सक्षात येताच तो मैदानाबाहेर गेला.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाची महत्त्वाची माहिती

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरच्या दुखापतीविषयी अधिकृत माहिती दिली आहे. इंग्लंड आणि ससेक्सची मेडिकल टीम आर्चरच्या दुखापतीवर संयुक्तरित्या काम करत आहे. आर्चरच्या उजव्या कोपराला झालेल्या दुखापतीमुळे तो न्यूझीवंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. पुढच्या आठवड्यात त्याच्या दुखापतीसंबंधी पुढचं पाऊल उचललं जाईल.

दुखापतीनंतर आर्चरने शानदार पुनरागमन केलं होतं पण…

दुखापतीतून सावरल्यानंतर इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर पुन्हा जुन्या लयीत दिसला. त्याच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समन हैरान असतात. काऊंटी चॅम्पियनशीपदरम्यान ससेक्सकडून खेळताना केंटविरुद्ध त्याने असा एक घातक बाऊन्सर टाकला की त्या बाऊन्सरने बॅट्समनचं डोकं फुटलं असतं पण बॅट्समनच्या चतुराईने तो थोडक्यात वाचला आणि पुढील अनर्थ टळला.

केंटविरुद्ध आर्चरचं खतरनाक रुप पाहायला मिळालं. आर्चरने जुन्या अंदाजात बोलिंग टाकून प्रतिस्पर्धी संघाच्या मनात धडकी भरवली. मॅचदरम्यान टाकलेल्या एका बाऊन्सरने बॅट्समन थोडक्यात वाचला. आर्चरने वेगाने टाकलेला बाऊन्सर खेळण्यात बॅट्समन जॅक लॅनिंगला अपयश आलं. त्याने क्षणार्धात पीचवर बैठक मारली आणि बॉलला कीपरकडे जाऊ दिलं. लॅनिंगच्या चतुराईने त्याला बॉल लागला नाही. जर लॅनिंगने योग्य वेळी पोझिशनमध्ये आला नसता तर त्याच्या डोक्याला वाऱ्याच्या वेगाने असणारा बाऊन्सर बॉल लागला असता.

(England Star bowler Jofra Archer Out Against New Zealand Test Series)

हे ही वाचा :

आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता सांगितलं दुसरंच नाव, रश्मिका मंदानाने कोहलीसह RCB च्या चाहत्यांचं हृदय तोडलं!

‘माही सरांकडून मला खूप मदत मिळाली’, भारतीय महिला क्रिकेट संघातील या खेळाडूला धोनीची शिकवणी!

Virat Kohli Vs Kane Williamson दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? आकडे कुणाच्या बाजूने?