AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता सांगितलं दुसरंच नाव, रश्मिका मंदानाने कोहलीसह RCB च्या चाहत्यांचं हृदय तोडलं!

रश्मिकाने आरसीबीच्या चाहत्यांना 440 व्होल्ट्सचा करंट दिलाय. विराट कोहली नाही तर एम एस धोनी माझा हिरो आहे, असं ती म्हणाली आहे. (MS Dhoni is my favourite Cricketer Says national Crush Rashmika Mandanna)

आधी म्हणाली विराट माझा फेव्हरेट, आता सांगितलं दुसरंच नाव, रश्मिका मंदानाने कोहलीसह RCB च्या चाहत्यांचं हृदय तोडलं!
रश्मिका मंदाना आणि विराट कोहली
| Updated on: May 18, 2021 | 7:29 AM
Share

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) बंगळुरुचा (RCB) संघ जिंकायला पाहिजे, असं लाजत लाजत सांगणाऱ्या आणि इशाऱ्या इशाऱ्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) माझा आवडता खेळाडू आहे, अशी ‘मन की बात’ सांगितलेल्या नॅशनल क्रश रश्मिका मंदानाने (Rashmika Mandanna) आता पलटी मारली आहे. विराट कोहली नसून एम. एस. धोनी (MS Dhoni) माझा आवडता खेळाडू आहे, असं ती म्हणाली आहे. (MS Dhoni is my favourite Cricketer Says national Crush Rashmika Mandanna)

रश्मिकाची बंगळुरु फेव्हरेट टीम पण आता…

आयपीएलदरम्यान एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका मंदनाच्या एका चाहत्याने, ‘तुझा आवडता आयपीएल संघ कोणता?’, असा प्रश्न विचारला. त्यावर अभिनेत्रीने क्षणाचाही विलंब न लावता, ‘ई साला कप नमदे’, असं उत्तर दिलं. म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ यंदा आयपीएलमध्ये जिंकायला हवा, असं तिने सुचित केलं. ‘ई साला कप नमदे’ हा विराट कोहलीच्या नेतृत्वात असलेल्या आरसीबी टीमचा नारा आहे. हे उत्तर ऐकून आरसीबी चाहते आनंदी झाले. रश्मिकाने हे उत्तर देताना हाताने हृदय देखील तयार केले होते. मात्र आता रश्मिकाने आरसीबीच्या चाहत्यांना 440 व्होल्ट्सचा करंट दिलाय.

रश्मिकाने RCB च्या चाहत्यांचं दिल तोडलं!

बंगळुरु ही माझी फेव्हरेट आयपीएल टीम असल्याचं रश्मिकाने सांगितलं होतं. मात्र आता तिने पलटी मारली आहे. एम एस धोनी हा माझा हिरो आहे, असं रश्मिका म्हणाली. नुकत्याच एका इन्स्टाग्राम लाईव्ह सेशनदरम्यान रश्मिका म्हणाली, “धोनीची बॅटिंग, कॅप्टन्सी आणि विकेट कीपिंग खूपच शानदार आहे. तो मास्टर क्लास खेळाडू आहे आणि त्याचमुळे तो माझा हिरो आहे, आयडॉल आहे.”

Video | अभिनयच नाही तर, क्रिकेटही रश्मिकाची आवड, आवडती IPL टीम विचारताच म्हणाली….

कोण आहे रश्मिका मंदाना?

रश्मिका मंदाना ही नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. रश्मिका तेलुगु आणि कन्नड इंडस्ट्रीमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींमध्ये एक आहे. रश्मिकाने 2016मध्ये ‘किरिक पार्टी’ या कन्नड चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. 2017 मध्ये तिने ‘चमक’ आणि ‘अंजनी पुत्र’ असे दोन सुपरहिट चित्रपट दिले. 2018 मध्ये रश्मिकाने तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत ‘चलो’ द्वारे प्रवेश केला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. रश्मिका मंदाना विजय देवरकोंडासमवेत ‘गीता गोविंदम’ आणि ‘डियर कॉम्रेड’मध्ये दिसली आहे. तिचे हे दोन्ही चित्रपट सुपर हिट ठरले होते (Fan Ask Rashmika Mandanna Favorite IPL Team Actress Gives Reply).

रश्मिका मंदानाने नुकतीच हिंदी चित्रपटसृष्टीतही प्रवेश केला आहे. अलीकडेच ती रॅपर बादशाह, युवा शंकर आणि उचना अमित यांच्या ‘टॉप टकर’ म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली. काही माध्यमांच्या वृत्तानुसार, रश्मिकाने तिचा दुसरा हिंदी चित्रपट ‘गुडबाय’ देखील साईन केला आहे, ज्यात अमिताभ बच्चन तिच्यासोबत दिसणार आहेत. बॉलिवूडमध्ये रश्मिका मंदना ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे डेब्यू करणार आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​दिसणार आहे.

(MS Dhoni is my favourite Cricketer Says national Crush Rashmika Mandanna)

हे ही वाचा :

‘माही सरांकडून मला खूप मदत मिळाली’, भारतीय महिला क्रिकेट संघातील या खेळाडूला धोनीची शिकवणी!

Virat Kohli Vs Kane Williamson दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? आकडे कुणाच्या बाजूने?

विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्रजांच्या भूमीत इतिहास घडणार, 89 वर्षांमध्ये न झालेली गोष्ट टीम इंडिया करुन दाखवणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.