AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्रजांच्या भूमीत इतिहास घडणार, 89 वर्षांमध्ये न झालेली गोष्ट टीम इंडिया करुन दाखवणार

टीम इंडिया पुढील महिन्यात न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळणार आहे. World test Championship final

विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्रजांच्या भूमीत इतिहास घडणार, 89 वर्षांमध्ये न झालेली गोष्ट टीम इंडिया करुन दाखवणार
team india
| Updated on: May 17, 2021 | 6:17 PM
Share

नवी दिल्ली: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया पुढील महिन्यात न्यूझीलंड विरोधात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल खेळणार आहे. हा सामना इंग्लंडमझील साऊथम्पटनमध्ये होईल. ज्यावेळी टीम इंडीया हा सामना खेळण्यासाठी मैदानावर अतरेल तो दिवस भारताच्या 89 वर्षांच्या कसोटी इतिहासातील ऐतिहासिक क्षण असेल. कारण, भारतानं आतापर्यंत त्रयस्थ ठिकाणी एकही सामना खेळलेला नाही. आयसीसीनं टेस्ट क्रिकेटसाठी मान्यता दिलेल्या 12 देशांपैकी केवळ 2 देशांनी आतापर्यंत त्रयस्थ ठिकाणी कसोटी सामना खेळलेला नाही. (Team India will play 1st test in history of 89 years on neutral venue at England against New Zealand World test Championship final)

भारताजवळ त्रयस्थ ठिकाणी खेळण्याची संधी होती

भारताकडे 1999 मध्ये त्रयस्थ ठिकाणी टेस्ट मॅच खेळण्याची संधी आली होती. मात्र, त्यावेळी टीम इंडिया आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहचू शकली नाही. आशियाई टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये बांग्लादेशातील ढाकामध्ये खेळवली गेली होती.

भारत त्रयस्थ ठिकाणी  पहिली मॅच खेळणार

भारत आणि बांग्लादेशनं आतापर्यंत एकही मॅच त्रयस्थ ठिकाणी खेळली नाही. आयसीसीनं कसोटी मॅच खेळण्यास मान्यता दिलेल्या बारा टीम पैकी भारत आणि बांग्लादेश वगळता इतर देशांनी त्रयस्थ ठिकाणी टेस्ट मॅच खेळल्या आहेत.या मध्ये सर्वाधिक मॅच पाकिस्तान त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियानं खेळल्या आहेत. पाकिस्ताननं 39, ऑस्ट्रेलिया 12, श्रीलंका 9 , दक्षिण आफ्रिका 7, न्यूझीलंड वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी 6 टेस्ट मॅच त्रयस्थ ठिकाणी खेळल्या आहेत.अफगाणिस्ताननं चार मॅच त्रयस्थ ठिकाणी खेळल्या आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनल

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन

अशी आहे टीम इंडिया :

विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव. तर केएल राहुल आणि वृद्धिमान साहा या दोघांना त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्यास संधी मिळेल

संबंधित बातम्या:

ICC World Test Championship Final | आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021 फायनल आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

PHOTO | बॅटिंगने गोलंदाजांना शॉक दिला, वर्ल्ड कप विजयाचा हिरो ठरला, टीम इंडियाच्या इलेक्ट्रिकल इंजीनियरची गोष्ट

(Team India will play 1st test in history of 89 years on neutral venue at england against New Zealand World test Championship final)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.