Video : पाकिस्तान इंग्लंडमध्ये रोमांचक मॅच, पाहा शेवटची ओव्हर

सुरुवातीला पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे त्यांची धावसंख्या 147 इतकी झाली होती.

Video : पाकिस्तान इंग्लंडमध्ये रोमांचक मॅच, पाहा शेवटची ओव्हर
पाकिस्तान इंग्लंडमध्ये रोमांचक मॅच
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 29, 2022 | 11:09 AM

पाकिस्तानच्या टीमने (Pakistan Team) आशिया चषकात (Asia Cup 2022) चांगली कामगिरी केल्याने त्यांची चर्चा अधिक आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत खेळाडू चांगले कामगिरी करतील अशी देखील आशा त्यांच्या चाहत्यांना आहे. काल झालेल्या मॅचमध्ये नेमकं सामना कोण जिंकणार अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु पाकिस्तानच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानची टीम विजयी झाली. कालच्या विजयामुळे पाकिस्तानच्या टीम मालिकेत 3-2 अशी आघाडी घेतली आहे.

आशिया चषकापासून पाकिस्तानच्या गोलंदाजांची गोलंदाजी अधिक भेदक झाली आहे. तसेच फलंदाजीमध्ये मोहम्मद रिजवान स
सध्या फॉर्ममध्ये आहे. मोहम्मद रिजवान सुद्धा विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

सुरुवातीला पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केल्यामुळे त्यांची धावसंख्या 147 इतकी झाली होती.

इंग्लंडची दुसरी इनिंग 139 धावांवर आटोपली, कारण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. त्यामुळे फलंदाजांना धावा काढणे अवगड झाले होते.

शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा महान फलंदाज मोईन अली खेळत होता. त्यावेळी एका ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांचाी गरज होती. त्यावेळी अशी झाली शेवटची रोमांचिक ओव्हर (0 0 Wd 6 0 1 0) अशी होती.