AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्यकुमार यादव याचा Playing 11 बाबत मोठा निर्णय

India vs South Africa 2nd T20i Toss Result and Playing 11 : पहिल्या टी 20i सामन्यात टीम इंडियाच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला होता. मात्र आता न्यू चंडीगडमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकलाय. टीम इंडियाने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

IND vs SA : टीम इंडियाने टॉस जिंकला, कॅप्टन सूर्यकुमार यादव याचा Playing 11 बाबत मोठा निर्णय
India vs South Africa 2nd T20i TossImage Credit source: Social Media
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 11, 2025 | 7:41 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने या मालिकेत विजयी सलामी दिली.  टीम इंडियाने मंगळवारी 9 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेचा 101 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाने यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. तर उभयसंघातील दुसरा सामना हा न्यू चंडीगड इथील मुल्लानपूरमधील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

प्लेइंग ईलेव्हनबाबत निर्णय काय?

कॅप्टन सूर्यकुमार यादव याने टॉस जिंकल्यानंतर प्लेइंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला. कॅप्टन सूर्याने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. टीम मॅनेजमेंटने त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 4 फलंदाज, 2 बॅटिंग ऑलराउंडर, 1 विकेटकीपर, 1 स्पिन बॉलिंग ऑलराउंडर, 1 स्पेशालिस्ट स्पिनर आणि 2 वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये 3 बदल

दक्षिण आफ्रिकेने पहिल्या पराभवानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. एनरिक नॉर्खिया, केशव महाराज आणि ट्रिस्टन स्टब्स या तिघांना विश्रांती दिली आहे. तर या तिघांच्या जागी अनुक्रमे ओटनील बार्टमॅन, जॉर्ज लिंडे आणि रीजा हेंड्रिक्स यांना संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेसमोर कमबॅकचं आव्हान

दरम्यान दक्षिण आफ्रिकेला मालिकेत 1-1 ने बरोबरी करायची असेल तर कोणत्याही स्थितीत हा दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. तर टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेतील आघाडी आणखी मजबूत करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे दुसरा सामना कोणता संघ जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा(विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्रक्रम(कॅप्टन), रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एन्गिडी आणि ओटनील बार्टमन.

Follow Us
तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना आवाहन
Raj Thackeray : तुम्ही Gen Z कधी उठणार? वृक्षतोडीवर राज ठाकरेंचं तरुणांना मोठं आवाहन
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदी...
राज्यातील शिक्षक, पदवीधरच्या निकालावरून काँग्रेसला डिवचलं; PM मोदींची पोस्ट चर्चेत!
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी...
भाजपच्या बंडखोरांना धक्का देत किरण सरनाईक यांचा विजय; कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद, म्हणाले…
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं
शिवसेना पक्षचिन्ह-आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी संपली; कोर्टात नेमकं काय घडलं?
विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
Maharashtra MLC Election Result 2026 : विधान परिषद निकाल; कोण विजयी? कोण पराभूत? A to Z माहिती
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत...
शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद, व्हीप आणि पक्षांतर्गत निवडणुकांवर उपस्थित केले सवाल
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा...
सह्याद्रीतील वृक्षतोडीवरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मोदींचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी!
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश,
संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच...
आज माझ्या भावाला जाऊन 9 महिने झाले अन् त्यासोबतच... सुप्रिया सुळेंचं भावनिक विधान
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लव
ठाण्याची अवस्था बीडपेक्षाही वाईट! अविनाश जाधवांचा सरकारला इशारा, लवकरच आंदोलनाचा इशारा