AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकहीजण वाचला नाही, सर्वच्या सर्व 22 मजूर ठार, काहींच्या डेडबॉड्या सापडणंही मुश्किल… अख्खा ट्रकच डोंगरावरून कोसळला…

रस्ते अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. रोडवरील वाहतूकीचे नियम न पाळल्याने अपघातात दिवसेंदिवस वाढतच आहे. या प्रकरणात दरीत कोसळलेल्या ट्रकमधील सर्वच्या सर्व मजूर ठार झाले आहेत.

एकहीजण वाचला नाही, सर्वच्या सर्व 22 मजूर ठार, काहींच्या डेडबॉड्या सापडणंही मुश्किल... अख्खा ट्रकच डोंगरावरून कोसळला...
प्रातिनिधीक छायाचित्र
| Updated on: Dec 11, 2025 | 7:07 PM
Share

अरुणाचल प्रदेशातील अंजॉ जिल्ह्यात गुरुवारी एक भयानक रस्ते अपघात घडला आहे. चकलागम येथे मजूरांनी भरलेला एक ट्रक पर्वतावरुन थेट दरीत कोसळला आहे. या ट्रकमध्ये एकूण २२ मजूर होते. त्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. माहितीनुसार यातील १९ मजूर हे आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील गिलापुकरी टी एस्टेटचे रहाणारे होते. सध्या घटनास्थळी बचाव पथकांद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले आहे. आतापर्यंत १३ मजूरांचे मृतदेह सापडले आहेत. अन्य मजूरांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे.

ट्रकमध्ये २२ मजूर होते

असे माहिती सांगितली जात आहे की सर्व मजूर रस्त्याच्या निर्मितीसाठी या ट्रकमधून जात होते. तेव्हा हॅलोंग-चकलागम रस्त्यावर मेटेलियांगच्या जवळ ट्रक अनियंत्रित होऊ डोंगरावरुन कोसळला. या अपघाताच्यावेळी २२ मजूर ट्रकमध्ये सवार होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या लोकांना जेव्हा ट्रक खाली कोसळताना पाहिला त्यानंतर पोलिस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस आणि फायर ब्रिगेडची टीम घटना स्थळी पोहचली आणि त्यांनी मदतकार्ये सुरु केले.

आसामच्या १९ मजूरांचा मृत्यू

पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या टीमने आतापर्यंत १३ मृतदेहांना ताब्यात घेतले आहे. ९ जणांचा शोध अजूनही सुरु आहे. १९ मजूरांची ओळख पटली आहे. ज्याची नावे बुद्धेश्वर दीप, राहुल कुमार, समीर दीप, जोन कुमार, पंकज मानकी, अजय मानकी, विजय कुमार, अभय भूमिज, रोहित मानकी, बीरेंद्र कुमार, अगर ताती, धीरेन चेतिया, रजनी नाग, दीप गौला, रामचबक सोनार, सोनातन नाग, संजय कुमार, करण कुमार आणि जोनास मुंडा अशी आहेत. हे सर्व १९ मजूर आसामच्या गेलापुखुरी चहाचा मळा, तिनसुकिया येथे राहाणारे आहेत.

असे म्हटले जात आहे की  ट्रक ज्या भागातील दरीत कोसळला, तो शहरापासून दूर दुर्गम भाग आहे. खूप वेळानंतर पोलिसांना या अपघाताची माहिती मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार पोलीसांना घटनास्थळी पोहचण्यासाठी १८ तास लागले. त्यानंतर बचाव मोहिम सुरु झाली. पोलिसांना आतापर्यंत १३ डेड बॉडी मिळाली आहे. ९ अन्य बेपत्ता आहेत. यापैकी कोणीही वाचण्याची शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर
इथं तुम्ही हुरडा खाल अन् परत जाल तर...मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर.
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद
तपोवनाची झाड तोडण्यास विरोध तरी वृक्षतोड सुरु,पालिकेच्या दाव्यानं वाद.