Raj Thackeray : राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, सवाल करताच थेट म्हणाले गुन्हा मान्य नाही…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 2008 मधील कल्याण मारहाण प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. कोर्टाने त्यांना गुन्हा मान्य आहे का असे विचारले असता, राज ठाकरे यांनी आरोप अमान्य करत आपण निर्दोष असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात हजर झाले. 2008 मधील या प्रकरणात कोर्टाने त्यांना गुन्हा मान्य आहे का, असे विचारले असता, राज ठाकरे यांनी गुन्हा अमान्य असल्याचे सांगितले. न्यायाधीशांनी एका महिन्यात प्रकरण संपवण्याचे सूतोवाच केले आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले, ज्याला राज ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. हे प्रकरण 2008 मध्ये कल्याण स्थानकात उत्तर भारतीय उमेदवारांना मनसैनिकांनी मारहाण केल्याच्या आरोपाशी संबंधित आहे. मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले होते. या प्रकरणी राज ठाकरेंना अटकही करण्यात आली होती. कोर्टाने आरोप निश्चित केल्यानंतर, राज ठाकरे यांनी आपण निर्दोष असल्याचा दावा करत खटला चालवण्याची मागणी केली.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल

