स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह

रोनाल्डोलो कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र तरीही त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोना पॉझिटिव्ह
| Updated on: Oct 13, 2020 | 9:23 PM

लिस्बॉन : पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला  (Cristiano Ronaldo) कोरोनाची बाधा झाली आहे. रोनाल्डोचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने (Portuguese Football Federation) याबाबत आपल्या वेबसाईटच्या माध्यामातून  माहिती दिली आहे. “रोनाल्डोला कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही. रोनाल्डोची प्रकृती स्थिर आहे. पण खबरदारीचा उपाय म्हणून रोनाल्डोने स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे”, अशी माहिती फुटबॉल फेडरेशनने दिली आहे. कोरोना झाल्याने रोनाल्डोला स्वीडन विरुद्ध बुधवारी होणाऱ्या सामन्याला मुकावे लागणार आहे. (Famous footballer Cristiano Ronaldo tested Corona positive)

फुटबॉल फेडरेशनच्या माहितीनुसार, पोर्तुगाल संघातील सर्व खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये रोनाल्डोचा अपवाद वगळता इतर सर्व खेळाडूंचा रिपोर्ट हा नेगेटिव्ह आला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची कारकिर्द

रोनाल्डो गेल्या 17 वर्षांपासून पोर्तुगालसाठी खेळतोय. रोनाल्डोला फीफाकडून 5 वेळा बॅलन डी ऑर पुरस्कराने सन्मानित करण्यात आलं आहे. रोनाल्डोने आपल्या नॅशनल टीमसाठी 2004 मध्ये पहिला गोल केला होता. त्यावर्षी त्याने एकूण 7 गोल केले होते. तेव्हापासून आतापर्यंत रोनाल्डो आपल्या संघासाठी खेळतोय.  2019  हे वर्ष रोनाल्डोच्या कारकिर्दीतील सर्वात चांगलं वर्ष राहिलं. 2019 मध्ये रोनाल्डोने एकूण 14 गोल केले होते.

संबंधित बातम्या :

जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारला कोरोना?

(Famous footballer Cristiano Ronaldo tested Corona positive)