जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारला कोरोना?

पॅरीसच्या सेंट जर्मन क्लबचे (पीएसजी) तीन फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत (Corona infected football player Nemar).

जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारला कोरोना?

फ्रान्स : पॅरीसच्या सेंट जर्मन क्लबचे (पीएसजी) तीन फुटबॉलपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत (Corona infected football player Nemar). फ्रान्सच्या अग्रणी फुटबॉल क्लबने याबाबतची माहिती दिली. पीएसजीने खेळाडूंच्या नावाचा खुलासा केलेला नाही. पण पॉझिटिव्ह आढळलेल्या खेळाडूंमध्ये जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारचाही समावेश आहे, असं एका क्रीडा वृत्तपत्राने म्हटले आहे (Corona infected football player Nemar).

कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूंमध्ये नेमार, अँजेल डी मारिया आणि लिअँड्रो पेरेडेस या खेळाडूंचा समावेश आहे, अशी माहिती एका वृत्तपत्राने दिली आहे. हे तिघेही सुट्टीत स्पेनमधील एका बेटावर फिरायला गेले होते.

जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. आता फुटबॉल खेळांडूनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फुटबॉल विश्वात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी क्रिकेट विश्वातीलही काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याचा फटका भारतात होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगला बसला आहे.

चार वर्ष बार्सिलोनामध्ये खेळल्यानंतर 2017 मध्ये 19.8 कोटी डॉलरसह नेमार फ्रान्सच्या पीएसजी क्लबमध्ये सहभागी झाला होता. पण नेमार सध्याचा पीएसजी क्लब सोडून पुन्हा स्पॅनिश क्लब बार्सिलोनामध्ये येण्यास तयार आहे, अशी चर्चा सुरु आहे.

नेमार फ्रान्सच्या क्लबमध्ये खूश नसून तो पुन्हा खास मित्र लिओनेल मेस्सीसोबत बार्सिलोनामध्ये राहण्यास इच्छुक आहे, अशा चर्चा दररोज माध्यमांवर सुरु आहेत. स्पेनच्या एका वृत्तपत्रानुसार नेमार बार्सिलोनामध्ये परत येण्यासाठी सध्याच्या पीएसजी क्लबमधील त्याच्या फीमधून 6000000 पाऊंड प्रती आठवडा कट करण्यास तयार आहे. जेणेकरुन तो स्पॅनिश क्लबमध्ये पुन्हा परतू शकेल.

यूरोपमधील बार्सिलोना नेमारचा पहिला क्लब होता आणि त्याने या क्लबसोबत दोन स्पॅनीश पुरस्कारही जिंकले आहेत. त्यासोबत बार्सिलोनामध्ये नेमारने क्लबसोबत तीन वेळा कोपा डेल रे आणि एकदा चॅम्पियन्स लीगचा पुरस्कारही जिंकला आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | आयपीएल सामन्यांसाठी कडक नियम, खेळाडूंच्या दर आठवड्याला 2 कोरोना टेस्ट

Pakistan Cricketer Corona | सलामीवीर, मधली फळी, तळाचे फलंदाज कोरोनाच्या कचाट्यात, पाकचे 10 खेळाडू पॉझिटिव्ह

Published On - 10:00 am, Thu, 3 September 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI