Vaibhav Suryavanshi : जो रेकॉर्डचा बाप, तोही भारावला; युवराजनं कोवळ्या वैभवचं भविष्यच लिहून ठेवलं; तुफान बॅटिंग पाहून काय म्हणाला

वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने 14 वर्षे 32 दिवसांचा असताना शतक ठोकलं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरला. युवराज सिंगसंह अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाच वर्षाव केला.

Vaibhav Suryavanshi : जो रेकॉर्डचा बाप, तोही भारावला; युवराजनं कोवळ्या वैभवचं भविष्यच लिहून ठेवलं; तुफान बॅटिंग पाहून काय म्हणाला
युवराजनं कोवळ्या वैभवचं भविष्यच लिहून ठेवलं; तुफान बॅटिंग पाहून म्हणाला..
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 29, 2025 | 8:51 AM

आयपीएल 2025मध्ये कालचा गुजरात वि. राजस्थानचा सामना चांगलाच गाजला. गुजरात टायटन्सने विजयासाठी 210 दिलेलं आव्हान राजस्थानने लीलया पार केलं आणि त्यात मोलाचा वाटा बजावला तो वैभव सूर्यवंशीने. त्याच्या वादळी खेळीमुळे राजस्थानला सहज विजय मिळाला. अवघ्या 35 चेंडूत त्याने शतक झळकावलं आणि टाळ्यांच्या कडकडाटाने स्टेडियम दुमदुमून गेलं.

विशेष म्हणजे अवघ्या 14 वर्षांच्या असलेल्या या खेळाडूची शतकी खेळी पाहून भलेभले अचंबित झाले. त्याने अक्षरश: चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. वैभवने 38 चेंडूत 101 करतानाच तब्बल 11 षटकार आणि सात चौकार फटकावले. त्याचे शतक पूर्ण होताच स्टेडियममध्ये सगळ्यांनीच कौतुकाने टाळ्या वाजवला, राजस्थानचा कोच राहुल द्रविड यांनीही आपल्या दुखापतग्रस्त पायाची पर्वा न करता ताडकन उठत वैभवचे मनापासून कौतुक केले. काल रात्रापासूनच वैभव हा चर्चेचा विषय ठरला असून एकाच षटकात 6 सिक्सर मारण्याचा विक्रम नावावर असलेला भारताचा माजी खेळाडू युवारज सिंगही त्याची खेळी पाहून भारावला. त्याने Xवर (पूर्वीचं ट्विटर) एक खास पोस्ट लिहीत वैभवचं मनापासून कौतुक केलं.

” हा (वैभव) 14 व्या वर्षी काय करतोय नक्की ?!! डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अप्रतिम खेळ करत हा मुलगा बेस्ट बॉलर्सचा चेंडू खेळून काढतोय. वैभव सूर्यवंशी – हे नाव आता ( सगळ्यांनी) लक्षात ठेवा.! कोणतीही भीती, तमा न बाळगता तो खेळतोय. पुढल्या पिढीतील उत्तम खेळ, त्यांची चमक पाहून खरंच अभिमान वाटतो ” अशा शब्दांत युवराज सिंहने त्याचे मनापासून कौतुक केलंय.

 

युवराज सिंगेन इंग्लडविरुद्धच्या सामन्यात एकाच षटकाता एकामागोमाग एक असे 6 षटकार ठोकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. त्याच्या रेकॉर्डचे सर्व स्तरांतून कौतुक झालं होतं, त्याच युवराजने वैभवच्या खेळीचं आणि शानदार शतकाचं दिलखुलासपणे कौतुक केलं.

वैभव सूर्यवंशी टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकणारा फलंदाज ठरला. त्याने 14 वर्षे 32 दिवसांचा असताना शतक ठोकलं आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयाचा शतकवीर ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वात वेगाना शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ख्रिस गेलच्या नावावर आहे.

दिग्गज खेळांडूकडून कौतुकाचा वर्षाव

भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही ट्विट केले की, “या तरुण खेळाडूची स्फोटक खेळी पाहणे खूप अद्भुत होतं !” असं त्याने लिहीलं आहे.

 

तर माजी भारतीय खेळाडू, अष्टपैलू युसूफ पठाण, याने 37 चेंडूत सर्वात जलद भारतीय आयपीएल शतक ठोकलं होतं. त्यावनेही वैभवचं भरभरून कौतुक केलं. “माझा विक्रम मोडल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचे अभिनंदन! विशेष म्हणजे त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना हे केले. या फ्रँचायझीमध्ये खरोखरच तरुण खेळाडूंसाठी काही जादू आहे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे, चॅम्पियन!”

 

बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील वैभवच्या खेळीने आश्चर्यचकित झाले. “अरे, हा वैभव सूर्यवंशी एक अद्भुत फलंदाज आहे. तो 14 वर्षांचा आहे आणि त्याने 35 चेंडूत शतक ठोकले आहे. आयपीएलच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटने किती अद्भुत प्रतिभा शोधली आहे.” असं त्यांनी लिहीलं होतं.