Shoaib Akhtar: पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरवर कोसळला दु:खाचा डोंगर; अतिशय जवळील व्यक्तीचे निधन
पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या क्रिकेटपटूने आपल्या जवळील व्यक्तीला गमावले आहे.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या भावाचे निधन झाले आहे. मोठ्या भावाच्या निधनाने त्याला तीव्र दुःख झाले आहे. शोएब अख्तरने स्वतः आपल्या मोठ्या भावाच्या निधनाची पुष्टी केली आणि फेसबुकवर ही दुःखद बातमी शेअर केली. शोएब अख्तरच्या मोठ्या भावाचे नाव शाहिद अख्तर होते. दोन्ही भावांमध्ये खूप प्रेम होते आणि म्हणूनच क्रिकेटच्या मैदानावर अनेक महान फलंदाजांना बाद करणाऱ्या या महान पाकिस्तानी गोलंदाजाला या घटनेमुळे खूप दुःख झाले आहे.
शोएब अख्तरला मोठा धक्का
शोएब अख्तरने फेसबुकवर आपल्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी शेअर केली आणि लिहिले, “अत्यंत दुःखाने मला तुम्हाला कळवावे लागत आहे की माझा मोठा भाऊ शाहिद अख्तर याचे निधन झाले आहे.” त्याने हितचिंतकांसाठी एक संदेशही दिला आहे की, “अंत्यविधीची वेळ आणि ठिकाणाची माहिती नंतर दिली जाईल.”
मोठा भाऊ शाहिदच्या निधानाने शोएब अख्तरला अधिक वेदना होत आहेत कारण त्याच्या क्रिकेट प्रवासात शाहिदने महत्त्वाची भूमिका बजावली होती. दोन्ही भावांमध्ये इतके अतूट प्रेम होते की ते एकमेकांची काळजी घेत असत. शोएब त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत जेव्हा जेव्हा वादात सापडला होता, तेव्हा शाहिद त्याच्या पाठीशी उभा राहिलेला पाहायला मिळाला. 2014 मध्ये शोएब अख्तरचे लग्न झााले तेव्हा त्याच्या मोठा भाऊ शाहिदने ही बातमी सर्वात अधीच जाहीर केली होती.
भाऊ शाहिद अख्तर कोण?
माहितीनुसार, शाहिद अख्तर एक फिटनेस ट्रेनर आणि फिजिओथेरपिस्ट होता. त्याने आपल्या भावाला अनेक वेळा दुखापतीतून सावरले आहे. शोएबने आता आपला सर्वात मोठआ आधआर गमावला आहे आणि तो कदाचित या धक्क्यातून कधीही सावरू शकणार नाही. शोएब अख्तरने 2021 मध्ये म्हणजे पाच वर्षांपूर्वी आपल्या आईला गमावले होते. आता त्याचा मोठा भाऊ शाहिदच्या रुपाने त्याने आपल्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची व्यक्ती गमावली आहे. शोएब अख्तरवर कोसळलेले हे अथांग दु:ख पाहून त्याच्या चाहत्यांनी शोक व्यकत केला आहे.