AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानामध्ये हवेतच तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली, इमर्जन्सी लँडिंग

लंडनवरून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या एका फ्लाइटमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे या विमानाचं पुन्हा एकदा हिथ्रो विमानतळावरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

विमानामध्ये हवेतच तांत्रिक बिघाड, मोठी दुर्घटना टळली, इमर्जन्सी लँडिंग
IndiGo flightImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 23, 2026 | 4:26 PM
Share

लंडनवरून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या एका फ्लाइटमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे या विमानाचं पुन्हा एकदा हिथ्रो विमानतळावरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानाने विमानतळावरून टेक ऑफ करताच काही वेळातच विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचं कळालं. त्यानंतर पुन्हा एकदा पायलटने या विमानाचं लंडनच्या हिथ्रो विमानतळावर लँडिंग केलं. सुदैवाने तांत्रिक बिघाड वेळीच लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. याबाबत माहिती देताना इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितलं की, विमान हवेत असतानाच विमानामध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्याचं कळालं, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पायलटने या विमानाचं हिथ्रो विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग केलं. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

दरम्यान हे विमान हवेत असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं, त्यानंतर या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं, सध्या या विमानाची तपासणी सुरू आहे. सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर पुन्हा एकदा टेक ऑफ करण्यात येईल, सध्या या सर्व प्रवाशांची व्यवस्था एका हॉटेलमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती देखील इंडिगोच्या प्रवक्त्याने दिली. आमच्या ग्राहकांना या प्रकारामुळे जो त्रास झाला, त्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो, असंही यावेळी इंडिगोने म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी 11 सप्टेंबरला देखील अशीच एक घटना घडली होती. अलायंस एअर कंपनीच्या एका विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता, त्यानतंर या विमानाचं दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. या विमानामधून 40 प्रवाशांसह चार क्रू मेंबरर्स प्रवास करत होते. विमानाच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.  यामुळे काही काळ प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. तसीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. लंडनवरून दिल्लीकडे निघालेल्या इंडिगोच्या एका फ्लाइटमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे या विमानाचं  हिथ्रो विमानतळावरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. या विमानाने विमानतळावरून टेक ऑफ करताच काही वेळातच विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड असल्याचं कळालं.

Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल