IND vs AFG: शतक अभिषेक शर्माने ठोकलं पण चर्चा गंभीरच्या रिअॅक्शनची, व्हिडिओ जोरदार व्हायरल
IND vs AFG Match: भारत अफगाणिस्तान यांच्यात टी-२० मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. या सामन्यात अभिषेक शर्माने शतकी खेळी खेळली, या शतकी खेळीनंतर गंभीरच्या रिअॅक्शनची जोरदार चर्चा झाली.

अभिषेक शर्माने दिल्लीत अवघ्या ३० चेंडूंमध्ये विक्रमी शतक झळकावले. त्याने दहा षटकार आणि नऊ चौकार ठोकले, ज्यामुळे तो आयसीसीच्या पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय शतक करणारा पहिला फलंदाज ठरला. अभिषेकचा काल मैदानावर रौद्र अवतार पाहायला मिळाला होता. शतक पूर्ण झाल्यावर अभिषेकने मैदानावर एका विशेष ध्यानस्थ मुद्रेत बसून आनंद साजरा केला. यानंतर गंभीरच्या ची जोरदार चर्चा सुरु आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार इब्राहिम झद्रानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सपाट खेळपट्टीवर अभिषेक शर्माने धुमाकूळ घातला. मैदानात येताच त्याने चौकार आणि षटकार मारायला सुरुवात केली. त्याने पहिल्या १६ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक आणि त्यानंतर पुढच्या १४ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. यामुळे तो आयसीसीच्या पूर्ण सदस्य राष्ट्रांमध्ये सर्वात जलद शतक करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. अभिषेकही असे फटके मारतो पण इतक्या कमी चेंडूत तो शतक करेल हे पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले असतील.
अभिषेकने या बाबतीत, न्यूझीलंडच्या फिन ॲलन (३३ चेंडूंत शतक) आणि झिम्बाब्वेच्या सिकंदर रझा (३३ चेंडूंत शतक) यांना मागे टाकले. आपले ऐतिहासिक शतक पूर्ण केल्यावर, अभिषेक मैदानाच्या मध्यभागी बसून देवाचे आभार मानत ध्यान करू लागला. अभिषेकचे हे सेलिब्रेशन पाहून प्रशिक्षक गंभीरही हसताना दिसले.
मात्र, शतक पूर्ण झाल्यावर अभिषेक फार काळ टिकू शकला नाही आणि ३४ चेंडूंत नऊ चौकार व ११ षटकारांसह १०८ धावा करून त्याचा डाव संपला. अभिषेक शर्मा बाद झाल्याने १४२ धावांची सलामीची भागीदारी संपुष्टात आली. अभिषेकनंतर, दोन चौकार आणि चार षटकारांसह ३५ चेंडूंत ५० धावा करून संजू सॅमसनही बाद झाला. भारताने १३ षटकांत १६४ धावा केल्या होत्या आणि आता भारतीय संघ तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना जिंकून अफगाणिस्तानला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल.