विश्वचषक ट्रॉफी घेऊन थेट या ठिकाणी मध्यरात्री पायीच पोहोचला सूर्यकुमार यादव, व्हिडीओ पुढे…

टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. या विजयानंतर एकच मोठा जल्लोष लोकांमध्ये बघायला मिळाला. आता यादरम्याचन एक खास व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विश्वचषक ट्रॉफी घेऊन थेट या ठिकाणी मध्यरात्री पायीच पोहोचला सूर्यकुमार यादव, व्हिडीओ पुढे...
Suryakumar Yadav
| Updated on: Mar 09, 2026 | 12:06 PM

टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफी (Icc T20 World Cup 2026) जिंकली. या विजयानंतर भारतीय चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच फलंदाजी करत धावांचा मोठा डोंगर भारतीय क्रिकेट संघाने रचला. त्यानंतर भारतीय गोलंदाजीपुढे न्यूझीलंडचे खेळाडू टीकू शकले नाहीत आणि भारताने थेट आयसीसी टी 20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. हा भारताचा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल. आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या सुरूवातीपासूनच भारत धमाकेदार गेम खेळताना दिसला. सूर्यकुमारने भारताला कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात हे घवघवीत यश मिळवून दिले. सूर्यकुमार यादव यासह टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा एकूण पाचवा कर्णधार ठरला. भारतात चाहत्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठा उत्साह बघायला मिळाला.

अहमदाबादच्या मैदानावर इतिहास रचल्यानंतर काही वेळातच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीर आणि आयसीसी अध्यक्ष जय शाह ट्रॉफी घेऊन पायी हनुमान मंदिरात पोहोचले. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या शेजारीच एक हनुमान मंदिर आहे, त्या हनुमान मंदिरात ट्रॉफीसह पायी जय शाह, गाैतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव हे पोहोचले.

हनुमानजींचे दर्शन घेतले आणि संघाच्या ऐतिहासिक विजयासाठी आशीर्वाद मागितले. या यादरम्यानच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. तिघेजण जात असून त्यांच्या आवती भोवती चाहते मोठ्या संख्येने जमले असून फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडीओवर चाहते मोठ्या संख्येने कमेंट करत आहेत.

भारतीय संघाने रविवार 8 मार्च रोजी अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांच्या मोठ्या फरकाने हरवून विश्वचषक जिंकला. यानंतर मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. भारतीय चाहते आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानात होते. विजयानंतर एकच मोठा जल्लोष करण्यात आला. सूर्यकुमार यादव आणि गाैतम गंभीर या विजयानंतर थेट हनुमान मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, ज्याचा व्हिडीओ पुढे आला.

Follow Us