AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suryakumar Yadav : जेव्हा सर्व काही चांगलं…, सूर्यकुमारची निवृत्तीबाबत मोठी घोषणा

Suryakumar Yadav On Retirement: टीम इंडियाने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये न्यूझीलंडला पराभूत करत एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकला. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Suryakumar Yadav : जेव्हा सर्व काही चांगलं..., सूर्यकुमारची निवृत्तीबाबत मोठी घोषणा
Suryakumar Yadav Indian Cricket TeamImage Credit source: PTI
| Updated on: Mar 09, 2026 | 8:52 AM
Share

टीम इंडियाने रविवारी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात न्यूझीलंडला पराभूत करत आयसीसी टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफी (Icc T20i World Cup 2026) जिंकली. सूर्यकुमारने भारताला कर्णधार म्हणून पहिल्याच प्रयत्नात हे घवघवीत यश मिळवून दिलं. सूर्या यासह टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा एकूण पाचवा कर्णधार ठरला. सूर्याआधी टीम इंडियाला हरमनप्रीत कौर रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि दिग्गज कपिल देव यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. टीम इंडियाच्या या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि हेड कोच गौतम गंभीर या दोघांनी पत्रकार परिषदेतून विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. सूर्याने या दरम्यान निवृत्तीबाबत प्रतिक्रियी दिली.

टीम इंडियाला रोहित शर्मा याने 2024 साली वर्ल्ड कप जिंकून निवृत्ती घेतली होती. सूर्यकुमार यादव यानेही त्याच प्रमाणे वर्ल्ड कप विजयानंतर निवृत्तीबाबत प्रतिक्रिया दिली. मात्र त्याने निवृत्ती घेतली नाहीय. सूर्याने निवृत्तीबाबत काय म्हटलं? हे जाणून घेऊयात. सूर्याचं वय 35 आहे.त्यामुळे सूर्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वानंतर निवृत्ती घेईल, असं म्हटलं जात होतं. मात्र सूर्याने यावर प्रतिक्रिया देत विषयाला पूर्णविराम लगावला आहे.

सूर्याने काय म्हटलं?

सूर्याने पत्रकार परिषदेत निवृत्तीबाबत उठणाऱ्या वावड्यांबाबत मजेशीर प्रतिक्रियी दिली. “जेव्हा सर्व काही इतकं व्यवस्थित सुरु आहे. तर मग निवृत्तीबाबत विचार करण्याची गरज काय आहे”, असं म्हणत सूर्याने सर्व चर्चांना पूर्णविराम लावला. सूर्याने सोबतच आपण इतक्यात निवृत्त होत नसल्याचं जाहीर केलं.

सूर्या फायनलमध्ये गोल्डन डक

सूर्याने अंतिम सामन्यात घोर निराशा केली. सूर्याला अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. सूर्या आला तसाच आऊट माघारी परतला. सूर्या पहिल्याच बॉलवर आऊट झाला.

सूर्याची कामगिरी

सूर्या टीम इंडियासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. सूर्याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वातील 9 सामन्यांमध्ये एका अर्धशतकासह एकूण 242 धावा केल्या.

9 पैकी 8 सामन्यांत विजय

दरम्यान सूर्याने टीम इंडियाचं या स्पर्धेतील एकूण 9 सामन्यांमध्ये नेतृत्व केलं. सूर्याने या 9 पैकी 8 सामन्यांत टीम इंडियाला विजयी केलं. तर फक्त एकाच सामन्यात पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 मधील सामन्यात भारतावर विजय मिळवला होता. भारताचा हाच या स्पर्धेतील एकमेव पराभव ठरला.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?