GT vs MI IPL 2025 : 33 SIX खाल्ले, 18 कोटीच्या या गोलंदाजाने IPL मध्ये गुजरात टायटन्सला बुडवलं

GT vs MI IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सच्या एका स्टार गोलंदाजाने खूप खराब प्रदर्शन केलं. या खेळाडूला गुजरात टायटन्सने 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं. पण त्याने संपूर्ण सीजनमध्ये 33 सिक्स खाल्ले आणि एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

GT vs MI IPL 2025 : 33 SIX खाल्ले, 18 कोटीच्या या गोलंदाजाने IPL मध्ये गुजरात टायटन्सला बुडवलं
gujarat titans
Image Credit source: PTI
| Updated on: May 31, 2025 | 12:21 PM

गुजरात टायटन्स टीमचा IPL 2025 मधील प्रवास संपुष्टात आलाय. एलिमिनेटर मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा 20 धावांनी पराभव केला. हा सीजन गुजरातच्या फलंदाजांसाठी खूप खास होता. साई सुदर्शन आणि शुभमन गिलने खोऱ्याने धावा केल्या. पण त्यांच्या टीमचा एक गोलंदाज संपूर्ण सीजन फ्लॉप ठरला. या खेळाडूवर गुजरातच्या टीमने खूप विश्वास दाखवला होता. मेगा ऑक्शनआधी त्याला 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं होतं. हा गोलंदाज अजून कोणी नसून स्टार लेग स्पिनर राशिद खान आहे. यंदाच्या सीजनमध्ये राशिद खानला आपली छाप उमटवता आली नाही.

आयपीएल 2025 चा सीजन राशिद खानसाठी कधीही आठवणीत न ठेवण्यासारखा सीजन आहे. आपल्या जादूई गोलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राशिद खानला यावेळी मैदानावर ती कमाल दाखवता आली नाही. 15 सामन्यात फक्त 9 विकेट घेणाऱ्या या अफगाणि लेगस्पिनरने एक नकोसा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. राशिद आयपीएलच्या एका सीजनमध्ये सर्वाधिक सिक्स खाणारा गोलंदाज बनला. त्याला या सीजनमध्ये एकूण 33 सिक्स पडल्या. हा आकडा त्याच्या करिअरमधील सर्वात खराब प्रदर्शन दाखवून देतो.

सिक्स खाण्यात मोहम्मद सिराजचा रेकॉर्ड मोडला

राशिद खान किफायती गोलंदाजी आणि फलंदाजांना चकवण्यासाठी ओळखला जातो. पण यावेळी राशिद फलंदाजांच्या निशाण्यावर होता. गुजरात टायटन्सकडून खेळताना त्याने 15 मॅचमध्ये 514 धावा दिल्या. त्याची सरासरी 57.11 ची होती. आयपीएल करिअरमधील त्याची ही सर्वात खराब सरासरी आहे. या सीजनमध्ये त्याचा इकोनॉमी रेट सुद्धा 9.34 चा होता. त्याच्या वर्ल्ड क्लास गोलंदाजीच्या दृष्टीने हे आकडे खूपच खराब आहेत. राशिदने मुंबई इंडियन्स विरुद्ध एलिमिनेटर सामन्यात 4 ओव्हरमध्ये 31 रन्स देऊन एकही विकेट काढला नाही. यात दोन सिक्स आहेत. या प्रदर्शनाने त्याने मोहम्मद सिराजचा 31 सिक्स खाण्याचा रेकॉर्ड मोडला. 33 सिक्ससह नको त्या यादीत प्रवेश केला.

या लिस्टमध्ये अजून कोण?

एकासीजनमध्ये सर्वाधिक सिक्स खाण्याचा रेकॉर्ड याआधी मोहम्मद सिराजच्या नावावर होता. मोहम्मद सिराजने वर्ष 2022 मध्ये 31 सिक्स खाल्ले होते. या लिस्टमध्ये वानिंदु हसरंगा (2022 मध्ये 30 सिक्स), युजवेंद्र चहल (2024 मध्ये 30 सिक्स), ड्वेन ब्रावो (2018 मध्ये 29 सिक्स) असे अनेक दिग्गज आहेत.