Warm-Up Match : दुसऱ्या वॉर्म-अप मॅचमध्ये हार्दिक पंड्या, ऋषभ पंत फेल

आजच्या टीममध्ये विराट कोहलीला संधी मिळालेली नाही.

Warm-Up Match : दुसऱ्या वॉर्म-अप मॅचमध्ये हार्दिक पंड्या, ऋषभ पंत फेल
T20 World Cup
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 13, 2022 | 2:28 PM

आजच्या मॅचमध्ये टीम इंडिया (Team India) गोलंदाजांनी कामगिरी केली आहे. कारण ऑस्ट्रेलियाची (Australia) धावसंख्या अधिक गतीने वाढवणाऱ्या फलंदाजाला आर.आश्विनने बाद केले. विशेष म्हणजे आर.आश्विनने (Ravichandran Ashwin) एका ओव्हरमध्ये तीन खेळाडूंना बाद केले आहे. तसेच इतर गोलंदाजांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली, तरी सुद्धा वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या टीमने 169 धावसंख्या उभारली.


आजच्या टीममध्ये विराट कोहलीला संधी मिळालेली नाही. पण फलंदाजीसाठी गेलेले हार्दिक पंड्या, ऋषभ पंत पुन्हा झटपट बाद झाले आहेत.

टीम इंडियाची धावसंख्या

पॉवर प्ले (6 षटके): 29/1
10 षटकात धावसंख्या: 60/3

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया स्कोअर

पॉवर प्ले (6 षटके): 54/1
10 षटकात धावसंख्या: 78/1
15 षटकांत धावसंख्या: 127/3
20 षटकांत धावसंख्या: 168/8

सराव सामन्यात भारताची प्लेइंग-11

रोहित शर्मा, केएल राहुल (कर्णधार), दीपक हुडा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग.

विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियातील खेळाडूंची नावे

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.