AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG: LIVE मॅचमध्ये David Warner जोरात जमिनीवर आपटला, चक्कर आली, पहा VIDEO

AUS vs ENG: नेमकं काय घडलं? ते जाणून घ्या....

AUS vs ENG: LIVE मॅचमध्ये David Warner जोरात जमिनीवर आपटला, चक्कर आली, पहा VIDEO
david-warnerImage Credit source: instagram
| Updated on: Oct 13, 2022 | 2:14 PM
Share

मुंबई: LIVE मॅचमध्ये अनेकदा खेळाडूंना दुखापती होत असतात. खेळाडू जिंकण्यासाठी आपल्याबाजूने शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न करतात. याच प्रयत्नात काहीवेळा खेळाडूंबरोबर दुर्घटना घडतात. डेविड वॉर्नर (David Warner) बरोबर असंच घडलं. इंग्लंड विरुद्ध (AUS vs ENG) टी 20 सीरीजच्या दुसऱ्या मॅचमध्ये दुखापत झाली. डेविड वॉर्नरला फिल्डिंग करताना ही दुखापत झाली. वॉर्नर कॅच पकडण्याच्या प्रयत्नात खाली पडला. त्याचं डोकं जोरात जमिनीवर आपटलं.

चेंडू जज करता आला नाही

इंग्लंडच्या डावात 15 व्या ओव्हरमध्ये डेविड वॉर्नरला दुखापत झाली. मिचेल स्टार्क गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर मोइल अलीने कव्हर्समध्ये शॉट मारला. तिथे उभ्या असलेल्या वॉर्नरला हा चेंडू योग्य पद्धतीने जज करता आला नाही. तो थोडा पुढे गेला.

वॉर्नरला वेदना होत होत्या

त्याने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण यात तो जमिनीवर मागे पडला. त्याचं डोकं जोरात जमिनीवर आपटलं. वॉर्नरला वेदना होत होत्या. त्याला चक्कर आली. या घटनेनंतर वॉर्नरला मैदानाबाहेर नेण्यात आलं. वॉर्नरची कनकशन टेस्ट करण्यात आली. वॉर्नर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने 11 चेंडूत फक्त 4 धावा केल्या.

इंग्लंडच्या 178 धावा

कॅनबरामध्ये हा सामना झाला. इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 178 धावा केल्या. डेविड मलानने 49 चेंडूत 82 धावा ठोकल्या. आपल्या अर्धशतकी खेळी दरम्यान मलानने 4 सिक्स आणि 7 फोर मारले. मोइन अलीने 27 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. त्याआधी कॅप्टन जोस बटलर 17 धावांवर आऊट झाला. एलेक्स हेल्सने 4 रन्स केल्या. स्टोक्स 7 आणि ब्रूक 1 रन्स करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.

ऑस्ट्रेलियाची खराब फिल्डिंग

ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या टी 20 सामन्यात तीन कॅच सोडल्या. पहिली कॅच ग्लेन मॅक्सवेलने सोडली. वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ दोघांनी दोन सोपे झेल सोडले. गोलंदाजीत स्टॉयनिसने 3 विकेट काढल्या. एडम झम्पाने 2, स्टार्क आणि कमिन्सने प्रत्येकी 1-1 विकेट काढला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.