IND vs SA : इतकं चांगलं खेळून मॅन ऑफ द सीरीज नाही, पण तरी हार्दिकने आपल्या एका कृतीने सगळ्यांना जिंकलं, VIDEO

IND vs SA : हार्दिक पंड्या इतका चांगला खेळला. पण त्याला मॅन ऑफ द सीरीजचा पुरस्कार मिळाला नाही. मात्र, तरीही तो निराश झाला नाही. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा टी 20 सामना झाल्यानंतर हार्दिकच्या एका कृतीने सगळ्यांच मन जिंकून घेतलं.

IND vs SA : इतकं चांगलं खेळून मॅन ऑफ द सीरीज नाही, पण तरी हार्दिकने आपल्या एका कृतीने सगळ्यांना जिंकलं, VIDEO
Hardik Pandya
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Dec 20, 2025 | 2:03 PM

IND vs SA Hardik Pandya : अहमदाबाद येथील अखेरच्या सामन्याने भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील टी 20 सीरीजचा शेवट झाला. या मॅचमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 30 धावांनी हरवलं. अहमदाबादच्या या सामन्यात हार्दिक पांड्यासोबत असं काही घडलं, जे समजल्यानंतर तो जास्त खुशही नाही, ना दु:खी आहे. थोडी खुशी, थोडी गम सारखी त्याची स्थिती आहे. पंड्यासोबत असं काय घडलं? त्याला काय समजलं? अहमदाबादच्या T20 सामन्यात हार्दिक पंड्याने 252 च्या स्ट्राइक रेटने 25 चेंडूत 63 धावा ठोकल्या. त्याने पाच फोर आणि पाच सिक्स मारले. या तुफानी इनिंगमध्ये पंड्याने 50 धावा फक्त 16 चेंडूत पूर्ण केल्या. अशा प्रकारे अभिषेक शर्माला मागे टाकून टी 20 मध्ये वेगवान हाफ सेंच्युरी झळकवणारा तो दुसरा भारतीय बनला.

अहमदाबाद टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या तुफानी बॅटिंगसाठी हार्दिक पंड्याला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर आऊट होऊन डग आऊटच्या दिशेने येत होता.त्यावेळी सोशल मिडिया मॅनेजरने सांगितलं की, वेगवान अर्धशतक झळकवणारा तो दुसरा खेळाडू आहे. पहिल्या स्थानाची संधी हुकली अस समजून तो दु:खी झाला. पण जेव्हा युवराजच्या नावावर हा रेकॉर्ड आहे समजलं, तेव्हा तो आनंदी झाला.

हार्दिकने सर्वांच मन जिंकलं

अहमदाबादच्या टी 20 सामन्यातील हार्दिक पंड्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात तो कॅमेरामनची गळाभेट घेताना दिसतो. हार्दिकने मारलेला एक फटका या कॅमेरामनच्या खांद्याला लागला. हार्दिकने आपल्या इनिंग दरम्यान सिक्स मारला. चेंडू थेट बाऊंड्रीच्या बाहेर उभ्या असलेल्या कॅमेरामनला येऊन लागला. आपली इनिंग संपल्यानंतर हार्दिक त्या कॅमेरामनची विचारपूस करायला गेला. हार्दिकने असं करुन सर्वांच मन जिंकलं.

हार्दिकचा हाच फॉर्म हवा

टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. यात हार्दिक पंड्याची निवड निश्चित मानली जात आहे. सध्या हार्दिक ज्या फॉर्ममध्ये आहे, तोच कायम राहिला, तर T20 वर्ल्ड कपमध्ये भारताला विजयाची एक चांगली संधी असेल.