भारतीय संघाला मोठा धक्का; मॅचविनर अफगाणिस्ताननंतर आता इंग्लंडविरुद्ध मालिकेतूनही बाहेर; कारण…
भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी आता भारतीय संघासाठी आता एक वाईट बातमी समोर आली आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. आज तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. या मालिकेतील दोन्ही सामने भारतीय संघाने जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. आजचा शेवटचा सामना जर भारतीय संघाने जिंकले तर मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधी असेल. या मालिकेत विराट कोहली आणि हार्दिक पंड्या खेळत नाहीये. कारण हे दोन्ही खेळाडू दुखापतीचा सामना करत आहे. दोन्ही खेळाडू इंग्लंड मालिकेतून कमबॅक करणार असे म्हटले जात होते. पण आता इंग्लंड मालिकेपूर्वी एक मोठे अपडेट समोर आले आहे. यामुळे आता इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. भारत पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करणार असून तिथे एकदिवसीय मालिका खेळणार आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडलेल्या विराट कोहलीच्या इंग्लंडमधील पुनरागमनाचा निर्णय 26 जून रोजी घेतला जाईल. या दिवशी विराटची फिटनेस चाचणी घेतली जाईल, ज्यावरून तो इंग्लंड संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होऊ शकेल की नाही हे निश्चित होईल.
हार्दिक पंड्या अलीकडेच अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. यामुळे आता तो मैदानात कमबॅक करण्यासाठी अजून उशिर करेल असे पाहायला मिळत आहे.
अफगाणिस्तान मालिकेपूर्वी हार्दिक बेंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये सराव करत होता तेव्हा त्याच्या मांडीला दुखापत झाली. हार्दिकने तात्काळ वैद्यकीय पथकाला या घटनेबद्दल माहिती दिली. पांड्याची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्याला अफगाणिस्तान मालिकेतून वगळण्यात आले. तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तंदुरुस्त होईल अशी आशा होती. मात्र, तसे झाले नाही आणि तो त्या मालिकेतही खेळणार नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये गोलंदाजी आणि खेळण्यासाठी हार्दिक अद्याप तंदुरस्त नाही. आता तो पुन्हा मैदानाता कधी कमबॅक करतो याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या असतील.