पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार का? धोनी म्हणतो…

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्याच नावाची गर्जना मैदानात ऐकायला मिळाली. धोनी जेव्हा उपविजेता […]

पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार का? धोनी म्हणतो...
Follow us on

हैदराबाद : मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएलच्या थरारक फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अवघ्या 1 धावाने पराभव केला. लसिथ मलिंगाने शेवटच्या चेंडूवर CSK च्या शार्दूल ठाकूरची विकेट घेतली आणि मुंबई इंडियन्सच्या फॅन्सची धडधड थांबली. या सामन्यात मुंबईने विजय मिळवला असला तरी चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्याच नावाची गर्जना मैदानात ऐकायला मिळाली. धोनी जेव्हा उपविजेता म्हणून बक्षीस घेण्यासाठी आला तेव्हा चाहत्यांनी धोनी, धोनीच्या घोषणांनी मैदान दणाणून सोडलं.

37 वर्षीय धोनीच्या निवृत्तीवर अनेकदा चर्चा होत असते. पण तरुण खेळाडूंनाही लाजवणारा फिटनेस धोनीकडे आहे. त्यामुळेच तो या चर्चांकडे कधीही लक्ष देत नाही. बक्षीस वितरण सोहळ्यात धोनीला पुढच्या आयपीएलमध्ये खेळणार का, असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने “Hopefully, Yes” असं उत्तर दिलं. एकीकडे चेन्नईचा 40 वर्षीय गोलंदाज इम्रान ताहीरने या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेत विक्रम केलाय. तर दुसरीकडे पुढच्या आयपीएलपर्यंत धोनी 38 वर्षांचा होईल. यावर धोनीने सूचक उत्तर दिलंय. धोनी आता विश्वचषकाच्या तयारीला लागणार आहे. सर्व लक्ष विश्वचषकावर असेल, असं त्याने सांगितलं.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक

धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी यष्टीरक्षक ठरलाय. मुंबईचा फलंदाज क्विंटन डी कॉकचा झेल पकडताच त्याने हा विक्रम नावावर केला. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 132 फलंदाजांना माघारी धाडलंय, ज्यात 94 झेल आणि 38 स्टम्पिंगचा समावेश आहे. यापूर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकच्या नावावर होता. कार्तिक सध्या दुसऱ्या क्रमांकावर, तर कोलकात्याचाच रॉबिन उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर आहे.