Vaibhav Sooryavanshi: वैभवला मैदानात थारा करु देणार नाही, अफगाणिस्तानच्या कॅप्टनने दिली वॉर्निंग
IND vs AFG T20 Series: भारत अफगाणिस्तान टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी अफगाणिस्तान कर्णधाराने वैभव सूर्यवंशीबद्दल एक विधान केले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेला आज रविवार 12 सप्टेंबर 2026 पासून सूरुवात होत आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडिअमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.
कर्णाधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणा असून वैभव सूर्यवंशीवर सगळ्यांच्या नजरा असणार आहे. वैभव सूर्यवंशी ज्याप्रकारे मैदानात खेळतो त्यानुसार अफगाणिस्तान संघाल एक विशेष रणनीती आखावी लागणार आहे.
अफगाणिस्तानचा संघ वैभव सूर्यवंशी विरोधात संपूर्ण प्लानने मैदानात उतरणार आहे, अशी माहिती कॅप्टन ईब्राहिम जादरानने प्रेस कॉन्फरेन्समध्ये दिली. वैभव सूर्यवंशीकडे खुप जबरदस्त टॅलेंट आहे. आयपीएलमध्ये खुप धावा काढल्या आहेत. तो खुप चांगला परफॉर्म करतो, असे सुरुवातीला ईब्राहिम जादरानने सांगितले.
ईब्राहिम जादरान म्हणाला, "आम्ही वैभव सूर्यवंशीचा विचार केला. आमच्यातल्या काही खेळाडूंनी आयपीएलमध्ये त्याच्या विरूद्ध मॅच देखील खेळले आहेत.
"आम्ही त्याचे काही व्हिडिओ देखील पाहिले आहेत. तसेच त्याच्याविरूद्ध आम्ही योग्य वेळेला योग्य प्लान ही आखूनच मैदानात उतरु," असे ईब्राहिम जादरानने सांगितले आहे.