IND vs AFG: 94 वर संघ ऑलआऊट, अफगाण कॅप्टन भडकला, टीम इंडियातील दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Ibrahim Zardan : भारत अफगाणिस्तान टी-२० मालिका भारतीय संघाने जिंकली. यानंतर कर्णधार इब्राहिम झादराने प्रचंड भडकला.

| Updated on: Sep 18, 2026 | 10:36 AM
1 / 5
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरी आणि शेवटची टी-20 सामना काल रंगला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. टीम इंडियाने अफगाणिस्तानला अवघ्या 94 धावांवर ऑलआऊट केले.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरी आणि शेवटची टी-20 सामना काल रंगला. या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला. टीम इंडियाने अफगाणिस्तानला अवघ्या 94 धावांवर ऑलआऊट केले.

2 / 5

यानंतर अफगाणिस्तान कर्णधार म्हणाला की, "आजच्या मॅचमध्ये पॉवरप्लेमध्ये आम्ही थोडी सुधारणा केली पण आणखी सुधारणेची वाव आहे. आम्ही ज्या दृष्टिकोनाने खेळलो तो अगदी योग्य होता. मात्र, आजच्या सामन्यात आमचे योगदान पुरेसे नव्हते हे मी मान्य करतो."

3 / 5

"एक-दोन मालिकांमध्ये आम्हाला कदाचित थोडा संघर्ष करावा लागू शकतो, पण मला खात्री आहे की वेळेनुसार आम्ही नक्कीच सुधारणा करू, आम्ही एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्या." अफगाणिस्तानचा कॅप्टन म्हणाला.

4 / 5

टीम इंडियातील नितीश कुमार रेड्डी अन् अक्षर पटेलवर पराभवाचे खापर फोडले. "या दोघांनी दोन ओव्हरमध्ये पाच विकेट्स घेतल्या, आम्ही यावर काम करू, असा विश्वास देखील अफगाण कर्णधाराने व्यक्त केला.

5 / 5

अफगाण कर्णधार म्हणाला की, "टी- ट्वेंटी वर्ल्ड कपनंतरची ही आमची पहिलीच मालिका होती. विशेषतः मोठ्या संघांविरुद्ध आम्हाला अधिक सामने आणि अधिक मालिका खेळण्याची गरज आहे, आम्ही जितके जास्त खेळू, तितकी आमची सुधारणा होईल अशी मला खात्री आहे."

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us