AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha: सोनाक्षी-झहीरने अर्पिता खानच्या घरी केली गणपतीची आरती; ट्रोल होऊ नये म्हणून आधीच उचललं असं पाऊल

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर गणपतीच्या आरतीचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र नेटकऱ्यांनी त्यावरून काही बोलू नये म्हणून तिने थेट कमेंट सेक्शनच बंद केलं आहे.

Sonakshi Sinha: सोनाक्षी-झहीरने अर्पिता खानच्या घरी केली गणपतीची आरती; ट्रोल होऊ नये म्हणून आधीच उचललं असं पाऊल
Zaheer Iqbal and Sonakshi SinhaImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 12:40 PM
Share

Sonakshi Sinha: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे बॉलिवूडमधील चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने दोघांनी सलमान खानची बहीण अर्पिता खान यांच्या घरी जाऊन बाप्पाची आरती केली. या खास क्षणाचा व्हिडीओ सोनाक्षी आणि झहीर यांनी सोशल मीडियावर शेअर केला. मात्र, या पोस्टची आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेत आहे. दोघांनी या व्हिडीओवरील कमेंट सेक्शन बंद ठेवलं आहे. अर्पिता खानच्या घरी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाची सुंदर सजावट करण्यात आली होती. विसर्जनापूर्वीच्या आरतीत सोनाक्षी आणि झहीर सहभागी झाले. व्हिडीओमध्ये दोघंही एकत्र गणेशाची आरती करताना दिसत आहेत. त्यांच्या मागे खान कुटुंबातील काही सदस्यही उपस्थित असल्याचं दिसतं. सोनाक्षीने पारंपरिक निळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता, तर झहीर पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसला.

दोघांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत बाप्पाप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली. मात्र, पोस्टवर प्रतिक्रिया देण्याची सुविधा बंद ठेवण्यात आली, म्हणजेच त्यांनी कमेंट सेक्शन बंद ठेवलं. सोनाक्षी आणि झहीर यांनी 23 जून 2024 रोजी लग्न केलं. त्यांच्या वेगवेगळ्या धार्मिक पार्श्वभूमीमुळे लग्नाच्या वेळी सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आता गणपतीच्या व्हिडीओवर कमेंट्स बंद ठेवण्याचा निर्णयही याच पार्श्वभूमीवर चर्चेत आला आहे. मात्र, त्यांनी कमेंट्स का बंद केले याबाबत दोघांनी स्वतःहून कोणतंही कारण जाहीर केलेलं नाही.

View this post on Instagram

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

सोनाक्षीने यापूर्वी एका मुलाखतीत दोघंही एकमेकांच्या संस्कृती आणि परंपरांचा आदर करत असल्याचं सांगितलं होतं. तिच्या म्हणण्यानुसार, झहीर तिच्या घरी दिवाळीच्या पूजेत सहभागी होतो, तर ती झहीरच्या कुटुंबातील धार्मिक परंपरांमध्ये सहभागी होते. त्यांच्या नात्यात एकमेकांच्या संस्कृतीचा आदर महत्त्वाचा असल्याचं तिने स्पष्ट केलं होतं. सोनाक्षीच्या लग्नानंतर वडील आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला होता. दोघंही एकमेकांसाठी योग्य जोडीदार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता सोनाक्षी-जहीरचा गणपती आरती करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा या जोडप्याची चर्चा रंगली आहे.

Follow Us
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!