Virat Kohli | स्टेडिअममध्ये घुसून विराट कोहलीला मिठी… त्या चाहत्याचीच सर्वत्र चर्चा !

IND vs AFG : 14 महिन्यांत प्रथमच भारतासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराट कोहलीसोबत इंदूरच्या होळकर स्टेडियमवर एक आश्चर्यकारक घटना घडली. प्रेक्षकांमधील एका चाहत्याने रेलिंगवरून उडी मारून आपल्या आवडत्या क्रिकेटपटूला, विरट कोहलीला मिठी मारल्याने सगळेच अवाक् झाले.

Virat Kohli | स्टेडिअममध्ये घुसून विराट कोहलीला मिठी... त्या चाहत्याचीच सर्वत्र चर्चा !
Image Credit source: social media
| Updated on: Jan 15, 2024 | 9:32 AM

इंदूर | 15 जानेवारी 2024 : टीम इंडिया वि. अफगाणिस्तानचा सामना रंगात आलेला.. अफगाणिस्तानचे खेळाडू बॅटिंग करत होते, १७ वी ओव्हर सुरू होती. भारतीय खेळाडू त्याना रोखण्यासाठी , एकेक धाव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते.  भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली फिल्डींग करत होता. अचानक स्टेडिअममध्ये गोंधळ सुरू झाला. सगळ्यांच्या नजरा त्याच दिशेने वळल्या, पाहतात तर काय  प्रेक्षकातील एक इसम अचानक स्टेडिअममध्ये घुसला आणि त्यान थेट विराटलाच मिठी मारली.

हे दृश्य पाहून सगळेच क्षणभर अवाक् झाल, विराटही बावचळला. पण त्याने स्वत:ला सावरले आणि तेवढ्यात मैदानातील रक्षकांनीही तेथे धाव घेतली. विराटला मिठी मारणाऱ्या  त्या तरूणाला मैदानाबाहेर नेण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल. सामना पुन्हा सुरू झाला पण सगळीकडे चर्चा सुरू होती त्या चाहत्याच्या मिठीचीच. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या या प्रकारानंतर बरीच चर्चा सुरू झाली. पण विराटने गेमवर लक्ष कायम ठेवले.

टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. अफगाणिस्ता 173 धावांचं आव्हान भारताने अवघ्या 15.4 ओव्हरमध्ये पूर्ण करत विजय मिळवला.

डायरेक्ट मिठीच

मात्र प्रेक्षकांमधील  एका चाहता हा अचानक स्टेडिअममध्ये घुसला आणि त्याने विराट कोहलीला थेट मिठीच मारली. टी-२० सामन्यादरम्यान प्रेक्षकातील त्या तरूणाने सुरक्षा कठडं तोडलं आणि थेट मैदानातच घुसला. फिल्डींग करणाऱ्या विराटसमोर जाऊन त्याने त्याला एकदम मिठीच मारली.

सुरक्षारक्षकांनी आणि मैदानातील इतर लोकांन घाईघाईत धाव घेत त्या तरूणाला स्टेडिअममधून बाहेर काढले आणि त्याची रवानगी पोलिस ठाण्यात करण्यात आली अशी माहिती पोलिसांनी दिली. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, विराटला मिठी मारणाऱ्या त्या युवकाकडे सामन्याचे तिकीट होते आणि तो नरेंद्र हिरवाणी गेटमधून होळकर स्टेडियममध्ये दाखल झाला होता. तो तरूण कोहलीचा मोठा चाहता आहे आणि विराटला भेटता यावे, याच इच्छेने प्रेक्षकांसाठी लावण्यात आलेली जाळी तोडून तो मैदानात उतरला.

आत आल्यावर त्याने विराट जिथे फिल्डींग करत होता, तेथे जाऊन त्याला थेट मिठीच मारली. या प्रकाराने विराटही बावचळला आणि प्रेक्षकही अवाक झाले. अखेर सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेतली आणि त्याला ताब्यात घेत जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली. त्याची चौकशी करण्यात येत असून चौकशीच्या आधारे याप्रकरणी पुढील कारवाई केली जाईल, असे रोलिसांनी सांगितले.

 

टीम इंडियाचा सामन्यासह मालिका विजय

यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे ही मुंबईकर जोडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. टीम इंडियाने अफगाणिस्तानवर दुसऱ्या टी 20 सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली. अफगाणिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 173 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनी टीम इंडियाचा विजय निश्चित केला.

या दोघांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना बॅटने झोडून काढलं. या दरम्यान यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या दोघांना वैयक्तिक अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 44 बॉलमध्ये 97 धावांची मोठी भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी 68 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर आलेला जितेश शर्मा झिरोवर आऊट झाला. त्यानंतर शिवम दुबे आणि रिंकू सिंह या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत पोहचवलं. रिंकू नेहमीप्रमाणे यंदाही नाबाद राहिला.