
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने कर्णधारपदाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने ट्रॅव्हिस हेडला तंबूत धाडलं. त्यानंतर चौथ्या षटकातच मोहम्मद सिराज तीन चौकार मारत मार्शने आपला आक्रमक पवित्रा दाखवला. मिशेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ जोडी मैदानात तग धरून राहिली. दुसऱ्या गड्यासाठी दोघांनी 72 धावांची भागीदारी केली.
सहावं षटक कर्णधार हार्दिक पांड्याने पुन्हा मोहम्मद सिराजला सोपवलं. या षटकात स्टीव्ह स्मिथने सिराजला गोलंदाजी करत धावत येताना रोखलं. साइट स्क्रिनमुळे त्रास होत असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर हार्दिक पांड्या सातवं षटक टाकत असताना असा प्रकार घडला. त्यामुळे तो पंचावर चांगलाच तापला.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) March 17, 2023
हार्दिक पांड्या गोलंदाजीसाठी लाँग रनअप घेत धावत आला आणि मिशेल मार्शनं त्याला रोखलं. साईड स्क्रिनमुळे काही अडचण असल्याचं सांगितलं. त्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी परत जाताना त्याने पंच नितीन मेनन यांना सुनावलं. हातवारे करत व्यवस्थित करण्याची सूचना केली.
ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली. दुसऱ्या षटकात ट्रेव्हिस हेड 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर मिशेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ जोडीने 72 धावांची भागीदारी केली. स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर खेळाडू झटपट बाद झाले. यानंतर मार्नस लाबुशेन मैदानात आला. तिसऱ्या विकेटसाठी मिचेल मार्श याने लाबुशेनसह 52 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श शतकाच्या दिशेने वाटचाल करत होता. मात्र मिचेल याला रविंद्र जडेजाने आपल्या बॉलिंगवर मोहम्मद सिराज याच्या हाती कॅच आऊट केलं. मार्शने 65 बॉलमध्ये 10 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 81 धावांची खेळी केली. मिचेल आऊट झाल्याने ऑस्ट्रेलियाची 4 बाद 129 अशी स्थिती झाली होती. मार्नस लाबुशेन 15, जोश इंग्लिस 26, कॅमरुन ग्रीन 12, ग्लेन मॅक्सवेल 8 आणि मार्कस स्टोइनिस 5 धावा करून बाद झाले.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत – शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कॅप्टन), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – ट्रेव्हिस हेड, मिशेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस, कॅमरून ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, सीन अब्बोट, मिशेल स्टार्क, एडम झाम्पा