IND vs ENG: We Want Sanju…चाहत्यांनी घेरताच गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, इंग्लंडविरुद्धच्या निराजशाजनक पराभवानंतर Video Viral
भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामनाही भारतीय संघाने गमावला आहे. आता भारतीय संघाला अनेक टीकेचा सामना करावा लागत आहे. भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरचा एक व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे ज्यात चाहते त्याच्याकडे एक विनंती करत आहे.

आयर्लंडनंतर, भारतीय संघाला इंग्लंडमध्येही केवळ पराभवांनाच सामोरे जावे लागत आहे. विद्यमान टी-20 विश्वविजेते संघ नवीन कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आपल्या पहिल्या यशाच्या प्रतीक्षेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले. हा पराभव सर्वात मोठा होता, ज्यात इंग्लंडने 125 धावांनी विजय मिळवला. हा पराभव आधीच मानहानीकारक ठरला. भारतीय संघाकडून अशी कामगिरी अपेक्षित नव्हती. संघात इतके तगडे खेळाडू असूनही संघाला सतत पराभवाला सामोरे जावे लागत आहे. संघात अनेक बदल होत आहे आणि या बदलांमुळे संघाच्या निकालांवर परिणाम होत आहे. आता या मानहानीकारक पराभवानंतर जेव्हा टीम इंडिया गाडीतून हॉटेलला जायला निघाली तेव्हा चाहत्यांनी गंभीरसमोर एकच घोषणाबाजी केली. ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे सर्व नॉटिंगहॅममध्ये घडले, जिथे ट्रेंट ब्रिज स्टेडियम पुन्हा एकदा टीम इंडियासाठी निराशाजनक ठरले. जवळपास चार वर्षांपूर्वी, सूर्यकुमार यादवने याच मैदानावर एक संस्मरणीय शतक झळकावले होते, पण तेही संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले होते. त्यांनी एकही सामना जिंकला नव्हता, पण यावेळी संपूर्ण संघ 100 धावा देखील करू शकला नाही आणि केवळ 76 धावांवर गारद झाला. कर्णधार श्रेयस अय्यरपासून ते 15 वर्षीय युवा वैभव सूर्यवंशीपर्यंत, भारतीय संघातील प्रत्येक फलंदाज यावेळी अपयशी ठरला.
या पराभवामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 0-2 ने मागे पडला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये संताप वाढला. भारतीय खेळाडू हॉटेलवर परतण्यासाठी बसमध्ये चढत असताना, हा संताप ट्रेंट ब्रिज स्टेडियमच्या बाहेर उफाळून आला. स्टेडियमच्या गेटबाहेर डझनभर भारतीय चाहते या क्षणाची वाट पाहत होते आणि प्रशिक्षक गंभीर यांच्यासह सर्व खेळाडू बाहेर पडू लागताच, त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या घोषणा संजू सॅमसनसाठी होत्या, ज्याला संघात पुन्हा स्थान देण्याची चाहत्यांची मागणी होती. या घोषणा मोठ्या आवाजात आणि बराच वेळ सुरू होत्या. प्रशिक्षक गंभीर यांनी या घोषणांवर कोणतीही प्रतिक्रिया न देता उपकर्णधार तिलक वर्मासोबत शांतपणे संघाच्या बसमध्ये प्रवेश केला.