IND vs ENG | अश्विन ठरला ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज, धोनीचा रेकॉर्ड मोडीत

| Updated on: Feb 15, 2021 | 7:26 PM

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार शतक लगावलं.

IND vs ENG | अश्विन ठरला असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय फलंदाज, धोनीचा रेकॉर्ड मोडीत
Follow us on

चेन्नई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवीचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या डावात धमाकेदार शतक लगावलं. अश्विनने 134 चेंडूमध्ये हे शतक लगावलं. अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 5 वं शतक ठरलं. अश्विनने एकूण 148 चेंडूत 1 सिक्स आणि 14 चौकारांच्या मदतीने खणखणीत 106 धावा केल्या. या खेळीसह अश्विनने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. अश्विनने धोनीचा 8 व्या क्रमांकावर खेळताना सर्वाधिक शतक लगावण्याचा रेकॉर्ड मोडीत काढला. अश्विनने आतापर्यंत तिसऱ्यांदा 8 व्या क्रमांकावर खेळताना शतक लगावण्याची कामगिरी केली आहे. तर धोनीने 2 वेळा 8 व्या स्थानावर फलंदाजीला येत सेंच्युरी केली होती. (Ravichandran Ashwin became first indian to Smash century at number 8)

8 व्या क्रमांकावर सर्वाधिक शतक लगावणारे भारतीय

आर अश्विन – 3

एमएस धोनी – 2

हरभजन सिंह – 2

कपिल देव – 2

तसेच अश्विन 8 व्या क्रमांकावर बॅटिंग करताना सर्वाधिक शतक लगावणारा दुसराच फलंदाज आहे. याबाबतीत न्यूझीलंडचा माजी कर्णधार डेनियल व्हिटोरी पहिल्या क्रमांकावर आहे. व्हिटोरीने 8 व्या क्रमांकावर खेळताना 4 वेळा शतक लगावलं आहे.

8 व्या क्रमांकावर सर्वाधिक शतकी खेळी करणारा फलंदाज

डेनियल व्हिटोरी – 4

आर अश्विन – 3

कामरान अकमल – 3

तिसऱ्यांदा 5 विकेट्स आणि शतक

दरम्यान अश्विनने या सामन्यात शतक आणि बोलिंग करताना 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनची अशी कामगिरी करण्याची ही तिसरी वेळ ठरली. अशी अफलातून खेळी करणारा अश्विन दुसराच खेळाडू ठरला आहे. याबाबतीत इयन बॉथम अव्वल क्रमांकावर आहेत. बॉथम यांनी 5 वेळा वेगवेगळ्या सामन्यात शतक आणि 5 विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटीत शतक आणि 5 विकेट्स घेणारे खेळाडू

इयान बॉथम – 5

आर अश्विन-3

जॅक कॅलिस-2

मुश्ताक मोहम्मद-2

शाकिब अल हसन-2

गॅरी सोबर्स-2

विराट-अश्विनने डाव सावरला

टीम इंडियाने दुसऱ्या डावात झटपट विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारताची 106-6 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन विराट कोहली आणि अश्विनने टीम इंडियाचा डाव सावरला. या दोघांनी आश्वासक भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी अर्धशतक पूर्ण केलं. सातव्या विकेटसाठी या दोघांनी शतकी भागीदारीच्या दिशेने आगेकूच केली. पण ही सेट जोडी फोडून काढण्यास मोईन अलीला यश आले. अलीने विराटला 62 धावांवर एलबीडबल्यू आऊट केलं. त्यामुळे या दोघांमध्ये शतकी भागीदारी होता होता राहिली. दोघांनी सातव्या विकेटसाठी 96 धावा जोडल्या.

इंग्लंडसमोर विजयासाठी 482 धावांचे आव्हान

अश्विनच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात सर्वबाद 286 धावा केल्या. टीम इंडियाकडे 195 धावांची आघाडी होती. यामुळे टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचे तगडे आव्हान दिले आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test 3rd day | अश्विनची होम पीचवर धमाकेदार शतकी खेळी

India vs England 2nd Test | भर मैदानात बेन स्टोक्सचा अतरंगीपणा, खाली डोकं, वर पाय, हातावरच चालू लागला

अवघ्या 5 तासाच उरकला कसोटी सामना, गोलंदाजाची कमाल, विश्व विक्रमाला गवसणी

(Ravichandran Ashwin became first indian to Smash century at number 8)