India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या ‘या’ स्टार खेळाडूला संधी

| Updated on: Feb 20, 2021 | 9:41 PM

या टी 20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. (IND vs ENG T20I Series)

India vs England T20 | इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, मुंबईच्या या स्टार खेळाडूला संधी
बीसीसीआयने (bcci) ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया (team india) विरुद्ध इंग्लंड (odi series against england) यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.
Follow us on

मुंबई : पुढील महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी 20 सीरीजसाठी भारतीय संघाची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा ही विराट कोहलीकडे असणार आहे. या सीरीजसाठी IPL मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया आणि इशान किशन या तिघांना संधी देण्यात आली आहे. (India squad for 5-match T20 series against England)

मुंबईकर सूर्यकुमार यादवला संधी

इंग्लंड विरुद्धच्या या टी 20 मालिकेसाठी मुंबईच्या सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमारने आयपीएलच्या 13 व्या मोसमात धमाकेदार कामगिरी केली होती. तसेच देशांतर्गत स्पर्धांमध्ये उल्लेखनीय खेळीही केली होती. त्यामुळे त्याला ही संधी देण्यात आली आहे.

या टी 20 मालिकेतील सर्व सामने अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या पाचही सामन्यांचे आयोजन 1 दिवसाच्या अंतराने करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या सर्व सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत सलग 5 वेळा टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली आहे. यामुळे इंग्लंड विरुद्धची ही मालिका जिंकून टी 20 मालिका विजयाचा षटकार मारण्याचा मानस टीम इंडियाचा असणार आहे.

सध्या उभयसंघात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. 4 सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी 1 सामना दोन्ही संघांनी जिंकला आहे. त्यामुळे मालिकेत 1-1 अशी बरोबरी आहे. तिसरा कसोटी सामना 24 फेब्रुवारीपासून अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा कसोटी सामना डे नाईट असून पिंक बॉलने खेळला जात आहे.

?टी 20 मालिकेचे वेळापत्रक

?12 मार्च | पहिली टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

?14 मार्च | दुसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

?16 मार्च | तिसरी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

?18 मार्च | चौथी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

?20 मार्च | पाचवी टी 20 मॅच | मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद | संध्याकाळी 7 वाजता

?इंग्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया :

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत(यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वाॅशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दिपक चहार, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर

?अशी आहे इंग्लंड टीम :

इयन मॉर्गन (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलींग्ज, जोस बटलर, सॅम करन, टॉम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिंग्विनस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिस टोपेल आणि मार्क वुड. (India squad for 5-match T20 series against England)

संबंधित बातम्या :

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा